आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Mistress Hanged Herself, Dogs Stays In The Hospital Along With The Dead Body, The Animal Did Not Leave Her Even After Death

मालकिणीने फाशी घेतली, नंतर रुग्णालयातही कुत्रे राहिले मृतदेहासोबतच, प्राण्याने मृत्यूनंतरही साथ सोडली नाही

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरच्या शिवधाम कॉलनीत राहणाऱ्या पलक बंगेजा (३५) या विवाहितेस माणसांनी धोका दिला तेव्हा दोन पाळीव कुत्र्यांना तिने आपले साथीदार बनवले. पलक एकांतात अश्रू ढाळत बसलेली असताना ते तिचे मूक साथीदार होते. कधी भुंकून, कधी चाटून तिची सांत्वन करण्याचा प्रयत्न करत. ते कधी तिला कुरवाळण्याचाही प्रयत्न करत. पलकने जेव्हा आत्महत्या केली. तेव्हा ते तिच्या पलंगाच्या आजूबाजूला भटकत होते. नंतर कुजलेला वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिस तेथे आल्यानंतर त्यांनी मृतदेह खाली आणला. दरम्यान कुत्र्यांचे वागणे दु:खी नातेवाइकांंसारखे होते. ते रुग्णवाहिकेत तिच्याजवळच जाऊन बसले. एक कुत्रा तिच्याजवळ होता, तर दुसरा पहिल्या सीटवर बसला होता.

पलकचे वडील कुलवंत होरा हे प्रॉपर्टी ब्रोकर आहेत. ९ वर्षापूर्वी पलकचे लग्न शीख तरुणासोबत झाले. पलकचे तिचा शाळकरी मित्र जितेशची प्रेमप्रकरण होते. पहिल्या पतीला घटस्फोट देऊन तिने ८ वर्षांपूर्वी जितेशशी विवाह केला. जितेशने तिला ड्रग्जची सवय लावली. त्यानंतर जितेशने तिला सोडले. ती व्यसनीच बनली.
 

बातम्या आणखी आहेत...