आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचारातून जमवलेली संपत्ती जप्त केली जाणार; भ्रष्ट लोकसेवकांना सरकारी लगाम, लवकरच काढला जाणार अध्यादेश 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सरकारी कर्मचारी-अधिकारी भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून सुटून ते पुन्हा या संपत्तीचा लाभ घेतात. मात्र, आता भ्रष्ट लोकसेवकांची भ्रष्टाचारातून कमावलेली संपत्ती जप्त करण्याचा कायदा अस्तित्वात येणार आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच जारी होणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी 'दिव्य मराठी'ला दिली. एसीबीच्या चौकशीत लोकसेवकाची अपसंपदा निष्पन्न झाल्यास ती जप्त करण्यासाठीचा कायदा राज्य सरकार तयार करत होते. गतवर्षी त्याचा शासन आदेश मंजूर झाला होता. कायद्याचे प्रारूप तयार असून लवकरच तो लागू केला जाणार आहे. त्यानुसार सर्व अधिकाऱ्यांना संपत्तीबाबत खुलासा करावा लागेल. 

 

कायद्यातील तरतुदी अशा 
ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा ५०% वर किंवा १० लाखांपेक्षा अधिक संपत्ती आढळल्यास त्याचा पैसा व मालमत्ता सरकारजमा केली जाईल. 

 

आरोपी निर्दोष ठरल्यास... 
संबंधित लोकसेवक निर्दोष ठरल्यास त्याचे सरकारजमा केलेले पैसे आणि मालमत्ता परत केली जाईल. संपत्ती देणे शक्य झाले नाही तर त्या बदल्यात पैसे दिले जातील. 

बातम्या आणखी आहेत...