आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून, 12 दिवस चालणार कामकाज, सल्लागार समितीच्या बैठकीत ठरली रूपरेखा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पावसाळी अधिवेशन कधी सुरू होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. त्यात आता अधिवेशनाची तारीख ठरली आहे. यावेळी 17 जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. 3 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात 12 दिवस कामकाज होईल, तर 18 जूनला अर्थसंकल्प सादर होईल. या अधिवेशनात 21 जून ते 24 जूनदरम्यान बजेटवर चर्चा केली जाणार आहे. राज्यपाल अभिभाषण चर्चा 19 आणि 20 जूनला होईल.

 

दरम्यान, पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार शक्य असल्याचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने पुन्हा जोर पकडलाय. मंत्रिमंडळातल्या काही जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे असंतुष्टांना गाजर दाखविण्यासाठी अशी खेळी खेळण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता लोकसभा निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर अधिवेशनापूर्वी हा विस्तार नक्की समजण्यात येतो.


राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या 5 ते 10 जूनच्या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. काही मंत्रिपदे ही नव्या लोकांना दिली जाणार आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळात नवीन नावांची चर्चा सुरू झाली आहे. या विस्तारात मंत्रिपद मिळाले तरी काम करण्यासाठी जेमतेम चार महिनेच मिळण्याची शक्यता आहे.


लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागल्याने राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षिरसागर, विजयसिंह मोहिते पाटील या काँग्रेस-राष्ट्रवादीतील बंडखोर नेत्यांना मोठी खाती देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...