आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर काडी दिसली तरी इथे लोकांना लाज वाटते; मेघालयात आहे आिशयातील सगळ्यात स्वच्छ गाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मावल्यान्नांग- मेघालयाची राजधानी शिलाँगपासून ८० किलोमीटर लांब डाउकी महामार्ग अाहे. येथून डावीकडे गेल्यावर सलग १८ किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दाेन्ही बाजूंनी शेतांमध्ये फुलझाडांमध्ये वापरण्यात येणारे गवत लावलेले दिसून येते. रस्त्यात डोळ्यांचे पारणे फेडणारी हिरवळ दिसते. बांगलादेश सीमेजवळ तमालपत्राची झाडे असणारे एक लहान गाव येते. हे काही साधारण गाव नाही. हे देशातीलच नव्हे तर आशियातील सर्वात स्वच्छ समजले जाणारे मावल्यान्नांग गाव अाहे. देशात चाैथे स्वच्छ सर्वेक्षण सुरू अाहे. सन २००३ मध्ये प्रसिद्ध मासिक 'डिस्कव्हर'ने या गावास देशातील सर्वात स्वच्छ गाव घोषित केले. त्या वेळी मेघालयाच्या ईस्ट खासी हिल्स जिल्ह्यातील हे गाव चर्चेत अाले. त्यानंतर २००५ मध्ये मासिकाने या गावाला आशियातील सर्वात स्वच्छ गावाचा किताब दिला.

 

निर्मल भारत किंवा स्वच्छ भारत अभियानापूर्वीच ईश्वराचा बगिचा (गाॅड्स अाेन गार्डन) असणाऱ्या या गावास आशियातील सर्वात स्वच्छ गावाचा सन्मान मिळाला. गाव इतके प्रसिद्ध झाले की अाता देश-विदेशातील पर्यटकांसाठी हे टुरिस्ट स्पाॅट बनले. स्वच्छ गावाच्या प्रचारामुळे गावातील प्रत्येक दुसऱ्या घरात हाेम काॅटेज अाहे. जवळपास ५५० लोकसंख्या अाणि ९८ घरे असणाऱ्या या गावात स्वच्छता म्हणजे लाेकांसाठी एक मिशन अाहे. स्वच्छतेस सुंदरतेकडे घेऊन जाणाऱ्या या गावासाठी प्रत्येक व्यक्ती अापले याेगदान देत अाहे. गावातील ज्येष्ठांपासून लहान मुलापर्यंत सर्व जण अापले घर, गाव स्वच्छ ठेवत अाहेत. महिलांचे वर्चस्व मानणाऱ्या खासी जमातीच्या या गावात राेज पाच व्यक्ती रस्त्यावर पडलेले प्रत्येक पान उचलतात. रस्त्यावर अागपेटीची काडी सापडणे ही येथे लज्जास्पद वाटते. आठवड्यातील एक दिवस गावातील सर्व जण रस्ता झाडून काढतात. वर्षातील एक दिवस शिलाँग-डाउकी महामार्ग १८ किलोमीटरपर्यंत स्वच्छ करतात. दररोज सरासरी ४०० ते ५०० पर्यटक येतात

 

गावात राेज किती पर्यटक येतात, या प्रश्नावर गावचे सरपंच बंजोपथ्यू खरंबा म्हणाले, पर्यटकांच्या माेजणीसाठी काही व्यवस्था नाही. परंतु चारचाकी वाहन अाणणाऱ्यांकडून अाम्ही ५० रुपये शुल्क घेताे. राेज सरासरी १०० पेक्षा जास्त वाहने येतात. यामुळे राेज ४०० ते ५०० लाेक येत असल्याचे अाम्ही समजताे. पूर्वी रात्र झाल्यावर पर्यटकांना थांबण्याची गावात काहीच साेय नव्हती. परंतु अाता अर्ध्या घरांमध्ये गेस्टहाऊस झाले अाहे. काही घरांमध्ये तमालपत्राच्या झाडावरती मचाण बनवले अाहे. ७० फूट उंच असणाऱ्या या मचाणावरून प्रत्येक व्यक्तीकडून २० रुपये शुल्क घेऊन बांगलादेशाचा व्ह्यू दाखवला जाता. गावाच्या प्रसिद्धीमुळे मेघालयाच्या मुख्यमंत्री व राज्यपालांसह देशविदेशातून लाेक येतात. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी अाॅक्टाेबर २०१५ मध्ये 'मन की बात'मध्ये गावाचा उल्लेख केला हाेता. स्वच्छतेमुळे गावाचा देशात सातत्याने गाैरव हाेत अाहे. अाॅगस्ट २०१७ मध्ये राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी कानपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात गावाचा सन्मान केला. हा पुरस्कार गाव अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी अाम्हाला प्रेरणा देतो. हाऊस स्टे चालवणारे ५० वर्षीय खलुरशई खोंगसाइन म्हणतात, बांबू कॉटेजसाठी २४ तासांसाठी अाम्ही दाेन हजार रुपये घेताे. महिन्यातील १५ ते २० दिवस अामच्या दाेन्ही काॅटेजमध्ये पर्यटक असतात. गावात प्लास्टिक पिशव्यांना बंदी अाहे. गावात काेणी धूम्रपान करत नाही. यामुळे विडी, सिगारेट मिळत नाही.

 

प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने केली स्वच्छतेची सुरुवात
गावाचे सरपंच (स्थानिक भाषेत त्यांना रंग्बा शेनाॅग म्हणतात) बंजोपथ्यू खरंबा सांगतात की, अामच्या गावात शंभर टक्के साक्षरता अाहे. सर्व घरांमध्ये पाइपलाइनने पाणीपुरवठा हाेताे. गावात एक पाेस्ट अाॅफिस, कम्युनिटी हाॅल, चर्च, मेघालय पर्यटन मंडळाचे कार्यालय व गेस्टहाऊस अाहेे. पर्यटकांशी गावकरी इंग्रजीत संवाद साधतात. शेती हे गावाचे उत्पन्नाचे मुख्य साधन हाेते. परंतु स्वच्छ गावाचा पुरस्कार मिळाल्यानंतर पर्यटकांची संख्या सतत वाढत अाहे. स्वच्छतेची सुरुवात कशी झाली, या प्रश्नावर खरंबा म्हणतात, १९८८ मध्ये प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने स्वच्छतेची सुरुवात केली. सर्वात अाधी गावातील प्रत्येक घरात शौचालय बनवले गेले. १९८९-९० मध्येच गावातील प्रत्येक घरात शौचालय झाले हाेते.

 

बातम्या आणखी आहेत...