आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५३ वर्षांतील सर्वात भीषण पूर; ६ फूट उंच लाटा; अनेक ऐतिहासिक स्थळांना पुराचा विळखा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन मार्को चौकात पुरातून मार्ग काढणाऱ्या महिला. बॅसेलिकामध्ये पर्यटकांसाठी वॉक-वे बनवला आहे. - Divya Marathi
सॅन मार्को चौकात पुरातून मार्ग काढणाऱ्या महिला. बॅसेलिकामध्ये पर्यटकांसाठी वॉक-वे बनवला आहे.

व्हेनिस - व्हेनिसला बुधवारी ५३ वर्षांतील सर्वात भीषण पुराचा तडाखा बसला आहे. शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून ऐतिहासिक ठिकाणांना पुराने वेढले आहे. प्रसिद्ध सेंट मार्क्स स्क्वेअरला पाण्यात वाट काढावी लागत आहे. पुरामुळे या भागात सुमारे सहा फूट उंचीच्या लाटा उसळू लागल्या आहेत. व्हेनिसचे महापौर लुइगी ब्रुग्नारो यांच्या मते १९२३ मध्ये अशाच प्रकारे पूर आला होता. गेल्या वर्षी खराब हवामानामुळे ११ जणांना प्राण गमवावे लागले होते. हवामान बदलामुळे जगभरातील ऋतूचक्र बिघडले, अमेरिका-रशियात झाले थंडीचे लवकर आगमन


एक दिवस आधीच अमेरिकेतील शिकागोमध्ये ६ इंच बर्फवृष्टी झाली. रशियात बर्फवृष्टीमुळे आधीच थंडी आली आहे. भारत-बांगलादेशात गेल्या आठवड्यात वादळाने थैमान घातले. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार हवामान बदल हे त्यामागील कारण आहे. आणखी काही दिवस ऋतूंमध्ये अशा प्रकारचा बदल दिसू शकतो.बातम्या आणखी आहेत...