Home | Business | Business Special | the most successful small businesses

कमी खर्चात सुरू करा कधीच न बुडणारे 3 व्यवसाय; आयुष्यभर होईल बक्कळ कमाई

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 14, 2019, 01:08 PM IST

यासाठी तुम्हाला ग्राहक शोधण्याची आवश्यकता नाही

 • the most successful small businesses


  नवी दिल्ली - व्यवसाय हा एक असा पेशा आहे ज्याची क्रेज सतत पाहायला मिळते. गेल्या काही वर्षात भारतात सुद्धा तरुणांमध्ये नोकरी सोडून स्टार्ट अप किंवा स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. दुसऱ्याकडे काम करण्यापेक्षा स्वतःला एखाद्या कंपनीचा मालक होण्याची संधी मिळाली तर कोण ही संधी सोडणार? व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त 10 हजार रूपयांची गुंतवणूक करून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही व्यवसायाविषयी सांगणार आहोत जे अगदी कमी भांडवलात सुरू करता येतात.


  ज्युस शॉप
  आज प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याकडे लक्ष देत आहे आणि ज्युस आरोग्यसाठी अतिशय चांगले आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या जागेची गरज भासत नाही. फक्त एक मशिन आणि थोडे फळे घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

  नाश्ता सेंटर किंवा टिफिन सर्विस
  हा तर नेहमी चालणारा व्यवसाय आहे. हा व्यवसाय कुठेही आणि कोणत्याही शहरात सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला ग्राहक शोधण्याची गरज नाही. एकदा तुमच्या दुकानाची माहिती लोकांना झाली की ग्राहक तुमच्याकडे आपोआप येतील. फक्त अट एवढीच की तुम्ही उत्तम सर्व्हिस दिली पाहिजे. या शिवाय तुम्ही एखादी कंपनी, शाळा, सर्विस सेंटर इत्यादी ठिकाणांसाठी टिफिन सर्विस सुरू करू शकता. या व्यवसायासाठी सुद्धा जास्त भांडवलाची गरज भासत नाही.

  ट्रॅव्हल एजन्सी
  भारतात नवीन मध्यम वर्ग सुरू झाल्यापासून ट्रॅव्हल एजन्सी व्यवसायात खूप वाढ झाली आहे. या व्यवसायातही मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. तुम्ही एखाद्या शहरात किंवा परिसरात राहत असाल तर तुम्ही घरबसल्या हा व्यवसाय सुरू करू शकता.

Trending