Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | the mother threw her two children into the well, then got herself fired in jalna

अपत्यांना विहिरीत फेकून विवाहितेने घेतले पेटवून; मुलगा-मुलगी मृत, विवाहिता ७०% भाजली

प्रतिनिधी | Update - Sep 07, 2018, 07:14 AM IST

मुलगा,मुलगी मृत तर विवाहितेवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सूरू आहे. परतूर तालुक्यातील औचार कंडारी येथील घटना.

  • the mother threw her two children into the well, then got herself fired in jalna

    परतूर- कौटुंबिक वादातून विवाहितेने मुलगा व मुलीस विहिरीत टाकून स्वत: जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परतूर तालुक्यातील औचार कंडारी येथे गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. शिवराज शरद मुळे (६), शिवानी शरद मुळे (४) यांचा मृत्यू, तर सखुबाई शरद मुळे (२६) ही विवाहिता ७०% भाजली आहे.


    गुरुवारी सकाळी सखुबाई हिचा धार्मिक कार्यक्रमास जाण्यावरून वाद झाला. त्यानंतर तिने गावाला जायचे आहे, असे सांगून मुलगा शिवराज व मुलगी शिवानीला शाळेतून घरी आणले. नंतर शेतातील विहिरीत ढकलून दिले. या प्रकारानंतर घरी येऊन सखुबाईने जाळून घेतले. त्यांच्या घरातून धूर येताना दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ७०% भाजलेल्या सखुबाईला उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Trending