आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलशांमुळे चळवळ गतिमान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोशनी शिंपी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य त्यांची भाषणे सर्वसामान्यांपर्यंत पोहाेचवण्याचे काम अनेक विचारवंत, साहित्यिक आणि व्याख्यात्यांनी तर केलेच आहे. पण सर्वाधिक मोलाचे काम आंबेडकरी जलसाकारांनी केले आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरच जलसाकारांनी क्रांतीचे बीजे रोवली नाहीत. तर बाबासाहेब हयात असतानाही आंबेडकरी जलसे होते. मुंबईतील १९५२ च्या निवडणुकीत भीमराव कर्डक या जलसाकाराने बाबासाहेबांना मते मागण्यासाठी वरळीतील एका सभागृहात जलसा केल्याची माहिती पुढे आली आहे. “माझ्या दहा भाषणांची  बरोबरी तुमचे एक गीत करते” असा अभिप्राय आद्य जलसाकार भीमराव कर्डक यांना खुद्द बाबासाहेबांनीच दिला होता. त्यावरून बाबासाहेबांना जलसाकारांच्या योगदानाची किती जाणीव होती. याची प्रचिती येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. भगवान ठाकूर यांनी १९८२ ते २००१ दरम्यानच्या २१ वर्षात संशोधन केले आहे. आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यात आंबेडकरी जलशांचे काय योगदान आहे..? याचा शोध त्यांनी पीएचडीच्या निमित्ताने घेतला. दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कृष्णा किरवले यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संशोधन केले. डॉ. ठाकूर यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जलसाकारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या मते बाबासाहेबांच्या हयातीतच अर्थात १९२० दरम्यानच त्यांच्यावर गीते रचण्यास सुरुवात झाली होती. बाबासाहेबांच्या क्रांतिकारी लढ्याची माहिती देण्यासाठी त्यावेळी भीमराव कर्डक यांनी वडाळा, वरळी येथे जलसे सादर केले होते. एकदा तर त्यांनी बाबासाहेबांच्या उपस्थितीतच भीमगीत सादर केले. त्यांच्या निवडणुकीत  ‘मत द्या, मत द्या, भीमरायाला मत द्या’ असे गीत त्यांनी सादर केले होते. आंबेडकरी चळ‌वळ जलसाकारांनीच समृद्ध केली अन् लोकांपर्यंतही नेली असा निष्कर्ष डॉ. ठाकूर यांच्या संशोधनातून पुढे आला आहे.

राज्यातील सर्व जलसाकारांवर टाकला प्रकाशझोत


भीमराव कर्डक (नाशिक), केरूबा गायकवाड (अकोला), केशव सुका आहेर (संगमनेर), रावजी सावळाराम गडकरी (सातारा), भीमराव हनुमंत अडागळे (निमज), दादासाहेब नामदेव पगारे (चांदोरी), देवधर सीताराम डांगे (नाशिक), बाळाजी रामजी भालेराव, माधवराव गंगाराम आहेर, कृष्णा हरी भालेराव (नाशिक), महादेव पगारे, माधवराव पगारे, केरुबा कर्डक, नामदेव सुर्वे, गोविंद गंगाराम मोरे (नाशिक), विठ्ठलराव गायकवाड, बळीराम गायकवाड या पुण्यातील बंधुंनी नवमतवादी जलशाच्या माध्यमातून प्रबोधनाची चळवळ चालवली.

बातम्या आणखी आहेत...