आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसस्थानकावर चित्रपटाची सोय, नवीन स्थानकांवर 60 आसानी मिनी थिएटर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यात विविध एसटी स्थानकांवर मिनी थिएटर बांधण्याचा निर्णय घेतला अाहे. खासगी-सार्वजनिक भागीदारीतून ६० अासनांचे हे मिनी थिएटर बांधण्यात येणार अाहे. त्यामुळे लवकरच प्रवाशांना एसटी स्थानकात चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध हाेणार अाहे. 

 

राज्यातील एसटी बसमधून दरराेज ६७ लाख प्रवासी प्रवास करीत असतात. प्रवासाच्या निमित्ताने स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना मनाेरंजनाची सुविधा मिळावी या उद्देशातून छाेटेखानी चित्रपटगृहे उभारण्यात येणार अाहेत. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारला जात अाहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकांमध्ये चित्रपटगृह उभारल्यास चित्रपटांचा अास्वाद घेता येऊ शकेल. या चित्रपटगृहात मराठी चित्रपट दाखवण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भाेसले यांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना दिली. 


चित्रपटगृहांच्या उभारणीसाठी अार्किटेक्टची नियुक्ती करण्यात येईल. अार्किटेक्टच्या माध्यमातून जागेचा शाेध घेण्यात येईल. राज्यात नव्याने उभारण्यात येत असलेल्या १०० नवीन एसटी स्थानकांपैकी काही निवडक स्थानकांमध्ये चित्रपटगृहांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे भाेसले यांनी सांगितले. 

 

बसपाेर्टची निविदा प्रक्रिया झाली सुरू 
परिवहन महामंडळाच्या ठरावीक बसस्टँडच्या जागी अत्याधुनिक साेयी-सुविधांनी युक्त असे बसपाेर्ट उभारण्याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली अाहे. सध्या पनवेल येथे बसपाेर्ट उभारण्याचे काम सुरू झाले अाहे. या बसपोर्टमध्ये प्रामुख्याने जागेनुसार सुसज्ज बसस्थानकाची रचना करण्यात येणार आहे. त्यात बस टर्मिनल, प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा, बस डेपो, सुसज्ज विश्रांती कक्ष, महामंडळाचे कार्यालय, प्रवाशांसाठी वाहनतळ तसेच व्यावसायिकांसाठी जागाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. पनवेलबराेबरच बाेरिवली, भिवंडी, पुणे (शिवाजीनगर), नाशिक (महामार्ग), अाैरंगाबाद, धुळे, जळगाव, नागपूर, अकाेला, नांदेड, साेलापूर या ठिकाणी बसपाेर्ट उभारण्याची याेजना अाहे. 


एसटी स्थानकांना मिळणार नवीन अाेळख 
राज्यात एसटीची ६०९ बसस्थानके असून त्यापैकी ५६८ बसस्थानके वापरात अाहेत. या बसस्थानकातून दरराेज हजारो प्रवाशांची ने-अाण केली जाते. परंतु गेली अनेक वर्षे या बसस्थानकांची दुरुस्ती वा रंगरंगाेटी करण्यात अालेली नाही. परिणामी बहुसंख्य बसस्थानकांना बकाल स्वरूप प्राप्त झाले. या पार्श्वभूमीवर राज्यभरातल्या एसटी स्थानकांची रंगरंगाेटी, नूतनीकरण करण्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली अाहे. पहिल्या टप्प्यात ३०५ बसस्थानकांची रंगरंगाेटी, नूतनीकरण करण्यात येणार अाहे. सर्व एसटी स्थानकांना साेनेरी पिवळा, अाकाशी निळा अशा रंगसंगतीत एकच विशिष्ट अाेळख देण्यात येणार असल्याचे भाेसले यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...