आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Murder Of A Priest In The Temple Of The Goddess; Stolen The Amount Of 2 Donations

देवीच्या मंदिरात पुजाऱ्याचा खून; 2 दानपेट्यांतील रक्कम लंपास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज : चोरट्यांनी वडमाउली देवीच्या मंदिरातील रामलिंग माधव ठोंबरे (६५) या पुजाऱ्याचा धारदार हत्याराने कान, मानेवर वार करून खून केला. त्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वारातील व मंंदिरातील दोन दानपेट्या फोडून चोरट्यांनी त्यातील रक्कम लंपास केल्याची खळबळजनक घटना वडमाउली दहिफळ (ता. केज) येथे शनिवारी मध्यरात्री घडली. रविवारी सकाळी त्यांची नात चहा घेऊन गेल्यानंतर घटना उघडकीस आली.


केज तालुक्यातील वडमाउली दहिफळ या गावापासून उत्तरेस ५ किमी अंतरावर डोंगरात वडमाउली (वडजू आई) देवीचे मोठे मंदिर आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून परिसरात ओळख असून येथे चैत्र महिन्यात वडमाउली देवीची मोठी यात्रा भरते. नवरात्रोत्सवही साजरा केला जातो. यात्रा आणि नवरात्रोत्सवाला परिसरातून भाविक भक्त मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. तर, भाविक हे सढळ हाताने दान करीत असल्याने मंदिराच्या प्रवेशद्वारात एक आणि मंदिरात एक अशा दोन लोखंडी दानपेट्या ठेवलेल्या आहेत. मंदिरात पुजारी म्हणून सेवा करीत असलेले रामलिंग ठोंबरे यांचे कुटुंब हे मंदिरापासून जवळच असलेल्या हरगडवाडी वस्तीवर वास्तव्यास आहे. पुजारी रामलिंग ठोंबरे शनिवारी रात्री वस्तीवर जेवण करून मंदिरात झोपण्यासाठी गेले होते. मंदिराच्यासमोर नंदीच्या मूर्तीजवळ झोपले असता मध्यरात्री चोरटे मंदिरात आले. चोरटे आल्याने ते झोपेतून धडपडून जागे होण्याच्या तयारीत असताना चोरट्यांनी पुजारी रामलिंग ठोंबरे यांच्या कानापासून मानेपर्यंत वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. चोरट्यांनी त्यांच्या तोंडावर चादर टाकून प्रवेशद्वारात असलेली दानपेटी फोडली. दानपेटीतील नोटा काढून घेतल्या. तर, चिल्लर तशीच दानपेटीत ठेऊन चोरटे मंदिराकडे गेले. मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम काढून चोरटे पसार झाले.


दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक आम्ले यांच्यासह केज व नेकनूर पोलिस ठाण्याच्या अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट आणि दरोडा प्रतिबंधक विभागाने घटनास्थळावरून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुठल्याही प्रकारचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नव्हते.

चोरट्यांनी देवीचा चांदीचा मुकुट ठेवला तसाच
श्वान पिराचीवाडी रस्त्यापर्यं

वडमाउली देवीच्या मंदिरात पाचारण करण्यात आलेले श्वान मंदिराभोवती फिरून परिसरातील झाडाझुडपांतून पिराचीवाडी रस्त्यापर्यंत माग काढत गेले. मात्र, तेथून चोरटे वाहनाने पसार झाले असावेत, असा पोलिसांचा अंदाज असून फिंगर प्रिंट एक्सपर्टने घटनास्थळावरून दानपेटीला लागलेले हाताच्या बोटाचे ठसे घेतले आहेत.

सीसीटीव्ही केले उलटे
मंदिराच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. परंतु, चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी चेहरे ओळखू येऊ नयेत म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे उलटे करून ठेवल्याचे निदर्शनास आले.


शोधासाठी चार पथके रवाना चोरट्यांचा शोध घेण्यासाठी केज येथील पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक मारुती मुंडे, फौजदार श्रीराम काळे यांची दोन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे व दरोडा प्रतिबंधक विभागाचा प्रत्येकी एक अशी चार पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

अडीच लाखांची रक्कम?
वडमाउली देवीच्या मंदिर विश्वस्त मंडळाने ऑडिट आणि नूतनीकरण केले नसल्याने धर्मादाय आयुक्तांनी चार महिन्यांपूर्वी दानपेट्या सील केल्या होत्या. तर दानपेट्या एक वर्षापासून उघडल्या नव्हत्या. त्यामुळे चोरट्यांनी फोडलेल्या दानपेटीत दोन ते अडीच लाखांची रक्कम असावी असा अंदाज ग्रामस्थांचा आहे.


एका दानपेटीतील रक्कम नेली नाही
चोरट्यांनी प्रवेशद्वारातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम नेली नाही. देवीचा चांदीचा मुकुटही चोरट्यांनी काढून घेतला नाही. मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम नेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे ही घटना चोरीच्या उद्देशानेच घडली का, असा संशयही ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
पुजारी ठोंबरे व मंदिरात फोडलेली दानपेटी.

बातम्या आणखी आहेत...