आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात दोन मित्रांतील वादातून धारदार हत्याराने भोसकून एका तरुणाचा खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदवड - किरकोळ कारणावरून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून येथील बस स्थानकातील रसवंतीगृहासमोर एका मित्राने दुसऱ्या मित्राचा धारधार तीक्ष्ण हत्याराने छातीत भोसकून खून केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


चांदवड येथील एसटी बसस्थानाकावरील श्री साई आराधना रसवंतीगृहासमोर बुधवारी सद्दाम फारुख शेख (२५, चांदवड) व प्रेम निवृत्ती पवार (रा. आडगाव ता. चांदवड) यांच्यात बाचाबाची होऊन त्याचे वादात रुपांतर होऊन प्रेम पवार याने त्याच्याजवळ असलेल्या तीक्ष्ण हत्याराने सद्दाम याच्या छातीत, पोटात वार केल्याने तो रक्तभंबाळ अवस्थेत जागेवर कोसळला. घटनेनंतर जखमी अवस्थेतील सद्दाम यास परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याबाबत मयत सद्दाम याचा भाऊ इम्रान शेख याने चांदवड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रेम पवार व माझा भाऊ सद्दाम हे जीवलग मित्र होते. सद्दाम हा स्वत:च्या मालकीच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीचा चालक होता. त्याचा काहीही  वाद नव्हता. पोलिसांनी संशयित प्रेम पवार याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

संशयित फरार
घटनेनंतर संशयित प्रेम पवार फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, रस घेतल्यानंतर दोघांमध्ये वाद होऊन संशयित प्रेम पवार याने आपल्या खिशातील चाकूने मयत सद्दाम याच्या पोटात व छातीवर वार केले.

बातम्या आणखी आहेत...