आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीवर रुजू होण्याच्या एक दिवस आधीच बीडच्या तरुणीचा गूढ मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - बीड येथील युवती तेजसा शामराव पायाळ (२९) हिचा मृतदेह पुणे येथील घरात सोमवारी आढळून आला. बीड येथे कुटुंबीयांसह दिवाळी साजरी केल्यानंतर १५ दिवसांपूर्वीच ती पुण्याला गेली होती. एमबीएची पदवी घेतलेली तेजसा मंगळवारी (ता.३ डिसेंबर) पुण्यातील एका कंपनीत रुजू होणार होती. परंतु, आदल्या दिवशी साेमवारी दुपारी तिचा मृतदेह संशयास्पदरीत्या फ्लॅटमध्ये आढळून आला. मूळ कुंभार वडगाव येथील रहिवासी असलेले पायाळ कुटुंब दोन दशकांपासून बीड शहरातील पंचशीलनगर भागात वास्तव्यास आहे. शामराव पायाळ हे रजिस्ट्री कार्यालयातून निवृत्त झाले. त्यांची मुलगी तेजसाने बीडमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले. 'एमबीए'साठी ती पुण्यात राहात हाेती. तेजसासोबत आई जयश्री, बहिणी श्रद्धा व तृप्ती याही राहत होत्या. श्रद्धा व तृप्तीचेही शिक्षण पुण्यात सुरू आहे. गावी शेतीकडे लक्ष द्यावे लागत असल्याने वडील बीड येथेच राहत होते. दरम्यान, तेजसा हिने नुकतीच कुटुंबीयांसह बीड येथे दिवाळी साजरी केली व पंधरा दिवसांपूर्वी ती पुण्याला गेली. आई व दोन्ही बहिणी मात्र इकडे बीडलाच होत्या. शुक्रवारी सायंकाळी तेजसाचे आई जयश्री यांच्याशी बोलणे झाले होते. शनिवारी सकाळी कुटुंबीयांनी नेहमीप्रमाणे तिच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेजसा फोन घेत नव्हती. अखेर सोमवारी आई जयश्री पायाळ या पुण्यात गेल्या असता त्यांना माणिकबाग भागातील घरात तेजसाचा मृतदेह आढळून आला. पुणे येथे ससून रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर तेजसाचा मृतदेह सायंकाळी बीड येथे आणण्यात आला. नंतर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाेकरीच्या शाेधात, पण माॅडेलिंगमध्ये करायचे हाेते करिअर
एमबीए झाल्यानंतर तेजसा ही नोकरीच्या शाेधात होती. शिवाय काही कंपन्यांमध्ये तिने मुलाखतीही दिल्या होत्या. त्यापैकीच एका कंपनीत ती मंगळवारी (ता. ३ डिसेंबर) रुजू होणार असल्याची माहिती नातेवाईक आशिष भालेराव यांनी दिली. तेजसाला मॉडेलिंग क्षेत्रातही करिअर करण्याची आवड होती. परंतु, तिच्या अशा अचानक जाण्याने पायाळ कुटुंबीय हादरून गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...