आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीतील गाळ काढताना आढळला रहस्यमय दीड फूट लांबीचा बूट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव  - तालुक्यातील बोथाकाजी गावात विहिरीचा गाळ काढणे सुरू असून या गाळामध्ये दीड फूट लांबीचा बूट सापडल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे. या घटनेची उलटसुलट चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी पुन्हा गाळ काढताना त्यापेक्षाही मोठा दीड फूट बूट आढळून आला आहे. हे बूट सर्वसाधारण माणसाच्या पायाचे माप असणाऱ्या व्यक्तीचे नाहीत. त्यामुळे हे बूट कोणाचे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. दरम्यान, याबाबत इतिहास संशोधकांनी हे बूट आपल्या भागातील नसून परकीय बनावटीचे असल्याचा दावा केला आहे. 


खामगाव तालुक्यातील बोथाकाजी या गावातही विहिरीतील जलपातळी खाली गेल्याने नागरिकांनी त्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून मजुरांकडून गाळ काढणे सुरू आहे. ही विहीर १०० ते १५० वर्षांपूर्वीची असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या विहिरीतील गाळ काढून विहिरीबाहेर फेकल्यानंतर त्या गाळामध्ये दीड फूट लांबीचा बूट सापडल्याचा दावा करण्यात आला होता. या बुटाची चांगलीच चर्चा झाली. याबाबत बुटाचे निरीक्षण केले असता हा बूट काळ्या रंगाचा असून त्यावर कंपनीच्या नावाचा लोगो अंकित आहे. त्या लोगोमध्ये जेएपी ही अक्षरे नमूद आहेत. यावरून कंपनी जपानची असल्याचे समजते. 

 

बोथाकाजीत अफगाणी लाेकांचेही वास्तव्य
इतिहास संशोधक डॉ. श्याम देवकर म्हणाले, या गावात मुस्लिम काजीचे वास्तव्य होते व त्यावरून गावाचे नाव बोथाकाजी पडले असे सांगण्यात येते. या काजीसोबत पठाणी, अफगाणी लोक वास्तव्यास असल्याचा कयास लावला जातो. जे लोक सामान्य भारतीयापेक्षा धिप्पाड असतात. त्यातील धिप्पाड पठाणी वा अफगाणी व्यक्तीचा तो असावा.