Home | International | Other Country | The name of Trump, the controversial Golan colony in Israel, will be delivered by PM Netanyahu

पीएम नेतन्याहू देणार इस्रायलमधील वादग्रस्त गोलान वसाहतीला ट्रम्प यांचे नाव; म्हणाले- डाेनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानू इच्छिताे

वृत्तसंस्था | Update - Apr 26, 2019, 11:24 AM IST

इस्रायलने सिरियाकडून बळकावला हाेता १,२०० चाै.मीटर भूभाग

  • The name of Trump, the controversial Golan colony in Israel, will be delivered by PM Netanyahu

    जेरुसलेम - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे ज्यू नागरिकांचा सण पासओ‌व्हरच्या सुट्या घालवण्यासाठी सध्या कुटुंबासाेबत गोलान भागात अाहेत. गोलानच्या डाेंगररांगेतील नव्या वसाहतीला अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे नाव देण्याची माझी इच्छा अाहे. कारण डाेनाल्ड ट्रम्प यांनी या डाेंगराळ भागावर इस्रायलच्या अधिकारास मान्यता दिली अाहे. याबद्दल अाभार मानण्यासाठी मी हे पाऊल उचलणार अाहे, असे नेतन्याहूंनी सांगितले.


    सुमारे १,२०० चाैरस मीटरमध्ये पसरलेला हा भाग सिरियाची राजधानी दमास्कसपासून ६० किमीवर उत्तर-पश्चिमेत अाहे. १९६७ मध्ये अरब-इस्रायल युद्धात इस्रायलने सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेला हा भाग सिरियाकडून बळकावून १९८१ मध्ये अापल्या देशात समाविष्ट केला. अांतरराष्ट्रीय समुदायासह अमेरिकेनेही या भागावर इस्रायलचा हक्क मान्य केला नव्हता. मात्र, गत मार्च महिन्यात ट्रम्प यांनी अमेरिकेचे खूप जुने धाेरण बदलून मान्यता दिली. ट्रम्प यांच्या वा ऐतिहासिक निर्णयामुळे इस्रायलचे नागरिक खुश असून, हा प्रस्ताव लवकरच सरकारसमाेर मांडण्यात येईल, असेही नेतन्याहूंनी सांगितले.

Trending