आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापवन कुमार
नवी दिल्ली - न्यायाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होणारे भारताचे मुख्य न्यायमूर्ती आणि मावळते मुख्य न्यायमूर्ती यांच्याबाबत दैनिक भास्करने नेहमीच विशेष वृत्त दिले आहे. ही ८ वी वेळ आहे.
नवे सरन्यायाधीश न्या. एस.ए. बोबडे
भारताचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. एस. ए. बोबडे १८ नोव्हेंबरला पदभार स्वीकारतील. त्यांचे निकटवर्तीय सांगतात की ते खूपच आनंदी आणि मितभाषी आहेत. ते बहुतांशी प्रकरणांमध्ये वकिलांना जास्तीत जास्त प्रश्न करतात. न्या. बोबडे यांना बाइक रायडिंग आणि कुत्र्यांची आवड आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील डॉ. आदिश चंद्र अग्रवाल सांगतात की, न्या. बोबडे यांना बाइक रायडिंग खूप आवडते. त्यांची आवडती बाइक रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट आहे. ते नेहमी ती स्वत: चालवताना दिसतात. यावर्षीच्या सुरुवातीला ते हार्ले डेव्हिडसन बाइकची टेस्ट ड्राइव्ह करत असताना अचानक बाइक घसरली आणि अपघात झाला. बाइकवरून पडल्याने न्या. बोबडे यांच्या पायाचा घोटा दुखावला होता. यामुळे ते बराच काळ सर्वोच्च न्यायालयात कामावर येऊ शकले नव्हते. कॉलेजिअमच्या बैठकीत भाग घेऊ शकले नव्हते. तसेच, रिकाम्या वेळी त्यांना पुस्तके वाचणे आवडते. घरी साधेपणाने राहतात. हाच साधेपणा सर्वत्र दिसतो.
> महाविद्यालयीन जीवनात न्या. एस. ए. बोबडे लॉन टेनिसचे खेळाडू होते. न्या. बोबडे यांचे वाचनावर आणि जंगलात फिरण्यावर विशेष प्रेम आहे.
न्या. बोबडे २३ एप्रिल २०२१ पर्यंत सरन्यायाधीशपदी राहतील. आधार कार्डांपासून अनेक महत्वपूर्ण निकाल देणाऱ्या तत्कालीन न्यायपीठांमध्ये न्या. बोबडे यांचा सहभाग होता. आधार कार्ड नसेल तर कोणताही भारतीय मूलभूत सुविधांपासून वंचित राहायला नको, असे न्या. बोबडे यांनी निकालात म्हटले होते. शिवाय, माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावरील आरोपांवर सुनावणी करताना त्यांनी न्या. गोगोईंना क्लीन चिट दिली होती. फटाक्यांवर बंदी आणणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या त्रिसदस्यीय पीठातही न्या. बोबडेंचा समावेश होता.
विद्यमान सरन्यायाधीश चीफ जस्टिस रंजन गोगोई
भास्कर न्यूज | नवी दिल्ली
भारताचे विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगाेई १७ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. गोगाेई सुमारे १८ वर्षे न्यायाधीश म्हणून न्यायपालिकेत राहिले. जर एखादा वकील पूर्णपणे ड्रेसअप होऊन आला नाही तर त्याला ते त्यांच्या न्यायालयात बोलू देत नसत. सरकारी अधिकाऱ्यांनाही चांगले कपडे नसल्यास फटकारायचे. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनावश्यक मेंशनिंगवर नियंत्रण आणत खटल्यांचा बोझा सर्वोच्च न्यायालयातून कमी केला. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील जयंत सूद सांगतात की, न्या. गोगोई खूपच मितभाषी आहेत. मात्र, न्यायासाठी कोणत्याही पातळीपर्यंत जातात. एखाद्याची चूक असल्यास त्यांना कठोर व्हायला वेळ लागत नाही. परंतु त्यांनी त्यांच्या कार्यकाळात न्यायालयात खटल्याची चांगली तयारी करून येणाऱ्या वकिलांचे नेहमीच कौतुक केले. नवीन वकिलांना त्यांनी विशेष प्रोत्साहन दिले. न्या. गोगोई धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. कार्यकाळात ते कामाख्या देवीच्या दर्शनासाठी दोन वेळा गेले. त्यांना प्राचीन इतिहासकारांची पुस्तके, धार्मिक पुस्तके वाचण्यात विशेष रस आहे. जयंत यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाचे सुमारे सात वर्षे न्यायाधीश असलेले न्यायमूर्ती गोगोई खूप शिस्तबद्ध होते. एकदा वकील योग्य वेशभूषा न करता त्यांच्या कोर्टात हजर झाले. त्यांनी वकीलावर केवळ टीकाच केली नाही, तर त्याचे ऐकण्यासही नकार दिला. सरन्यायाधीश गोगोई म्हणाले होते की, जो वकील स्वत: ला व्यवस्थित शिस्तबद्ध आणि संघटित ठेवू शकत नाही, तो वकील इतरांना न्याय देण्यास पात्र नाही. न्यायालय हे वकील व न्यायाधीशांसाठी मंदिरासारखे आहे. नियम पाळणे महत्वाचे आहे.
> अयोध्या वादावर ऐतिहासिक निकाल दिला, राफेल प्रकरणावर पुनर्विचार याचिका फेटाळली. मुख्य न्यायमूर्तींना आरटीआयअंतर्गत आणले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.