आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे सरकार कर्नाटक - महाराष्ट्र सीमाप्रश्न सोडवेल असा विश्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्वलाताई पाटील यांचा सत्कार करताना एनयूजेएमच्या महाराष्ट्र अध्यक्षा शितल करदेकर, बेळगावचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत काकतीकर, वैशाली आहेर, कैलास उदमले यांची उपस्थिती होती. - Divya Marathi
उज्वलाताई पाटील यांचा सत्कार करताना एनयूजेएमच्या महाराष्ट्र अध्यक्षा शितल करदेकर, बेळगावचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत काकतीकर, वैशाली आहेर, कैलास उदमले यांची उपस्थिती होती.

बेळगाव : 'महाराष्ट्रातील नवे सरकार कर्नाटक-बेळगाव सीमाप्रश्न नक्कीच सोडवेल अाणि कानडींच्या अत्याचारांपासून सीमावासीयांना मुक्ती मिळेल', असा विश्वास बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणारे दिवंगत माजी अामदार संभाजी पाटील यांच्या पत्नी उज्ज्वलाताईंनी व्यक्त केला.

नॅशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट‌्सच्या महाराष्ट्रातील प्रतिनिधींनी बेळगाव दाैऱ्यात त्यांची भेट घेतली, तेव्हा त्या बाेलत हाेत्या. या सरकारमधील प्रमुखांना सीमावासीयांच्या वेदना माहिती आहेत. मात्र महाराष्ट्रातील युवा पिढीला सीमावाद हा विषयही माहिती नाही. तो आपण त्यांच्यापर्यंत प्रखरतेने पोहाेचवू शकता, असे उज्ज्वलाताई म्हणाल्या. एनयूजे महाराष्ट्राच्या अध्यक्षा शीतल करदेकर म्हणाल्या की, 'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीमाप्रश्न सोडवण्यासाठी पूर्वी मध्यवर्ती मार्ग काढला होता. मात्र या आंदोलनातील मुखवटेधारी लांडग्यांनी त्यावेळी विस्कोट केला. मात्र या आंदोलनातील मुखवटेधारी लांडग्यांनी त्यावेळी विस्कोट केला आणि आपल्या फायद्यासाठी प्रश्न धगधगत ठेवला. आता मात्र मराठी लाेकांवर होणारे अन्याय थांबले पाहिजेत. येत्या काळात बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र नक्कीच होईल आणि ताे आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही पुन्हा बेळगावात येऊच.'

बातम्या आणखी आहेत...