आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपान सरकार 2020 पासून आणतेय नवा कायदा, अधिकारी कामानंतर कनिष्ठास ड्रिंक पार्टीत बोलावू शकणार नाहीत, हे शोषण मानले जाईल

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

टोकियो - जपान जगातील विकसित देशांपैकी एक आहे. येथील लोकांमध्ये कष्टाळू वृत्ती असणे यामागचे कारण मानले जाते. येथील कामाच्या ठिकाणी रोज १०-११ तास काम करणे सामान्य बाब असते. त्यामुळे ऑफिसनंतर सहकाऱ्यांसोबत पार्टी करणेही जपानमध्ये सामान्य मानले जातेे. मात्र, यावर आता आडकाठी येण्याची शक्यता आहे. जपान सरकार पुढील वर्षी(२०२०) नवीन कायदा आणत आहे. त्यानुसार एखादा वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ कर्मचाऱ्यास कामानंतर पार्टीसाठी विशेषत: मद्य किंवा बियरच्या पार्टीसाठी बोलावत असेल तर त्याचे शोषण मानले जाऊ शकते. जपानमध्ये कामाच्या ठिकाणी शिस्तीला खूप महत्त्व दिले जाते. वेळेआधी कार्यालयात येणे,वेळेनंतर कार्यालयातून बाहेर पडणे, बॉसच्या विविध बाबी मान्य करणे ही येथील संस्कृती आहे. त्यामुळे बाॉस कामानंतर पार्टीला बोलावत असेल तर अनेक कर्मचाऱ्यांना इच्छा नसतानाही सहभागी व्हावे लागते. जपानमध्ये सहकाऱ्यांसोबत ड्रिकिंग पार्टीचा उद्देश एकमेकांना चांगल्या पद्धतीने समजून घेणे हा असतो. मात्र, यामुळे मद्यपान न करणारे किंवा कमी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वत:चे शोषण झाल्यासारखे वाटते. बॉसला नकार  दिल्यास नोकरी जाण्याची किंवा कमी वेतनवाढ मिळण्याचा धोका राहतो. सरकारने ही समस्या गांभीर्याने घेतली असून याच्याशी संबंधित कायदा पुढील वर्षी लागू होणार आहे. मात्र, याचे परिणाम अनेक प्रमुख जपानी कंपन्यांत पाहायला मिळत आहेत.

पॉवर हरॅशमेंट मानली जाते ड्रिंकिंग पार्टी
बीबीसीच्या अहवालानुसार, टोकिओमध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीचा अधिकारी म्हणाला, जपानमध्ये प्रथम कार्यालयानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे परस्परांसोबत पार्टी करणे सामान्य बाब होती. मात्र, नव्या कायद्याच्या हालचाली दिसताच वरिष्ठ अधिकारी सतर्क झाले आहेत. क्योटो विद्यापीठाचे प्रा. कुमिको ननेमोतो म्हणाले, ड्रिंकिंग पार्टीला आता पाॅवर हरॅशमेंटच्या दृष्टीने पाहिले जाते. ज्याच्यावर असे करण्याच्या आरोप ठेवले जाते त्याची करिअर वृद्धी मंदावण्याचा धोका आहे.

बातम्या आणखी आहेत...