आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या सेटवर होईल 'सुपरस्टार सिंगर' च्या ग्रँड फिनालेचे शूटिंग, वास्तुमुळे बदलले गेले लोकेशन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : 3 महिन्यांपासून सुरु आहे सिंगिंग रियलिटी शो 'सुपरस्टार सिंगर' फिनालेला पोहोचला आहे. विशेष गोष्ट ही आहे की, ग्रँड फिनालेच्या शूटिंगसाठी नवा सेट तयार केला गेला आहे. शोशी निगडित एका सूत्राने सांगितले की, लोकेशन बदलण्याचा निर्णय वास्तुशास्त्राण्यासार, केला गेला आहे.  आतापर्यंत शूटिंग गोरेगाव येथील फिल्मसिटीमधील सेटवर सुरु होते. पण फिनाले यापासून 20 किमी. दूर मीरा रोडवर बनलेल्या नव्या सेटवर शूट होईल.  

ओमंग कुमारने बनवला नवा सेट... 
बॉलिवूडचा प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर ओमंग कुमारने शोचा नवा सेट बनवला आहे. हा बनवण्यात एका आठवड्याचा वेळ लागतो आणि 500 पेक्षा जास्त लोकांनी यावर काम केले. सेट पूर्णपणे प्लायवुड, लोखंड, फायबर, प्लाज्मा आणि एलईडीने बनवला आहे. प्लास्टिक फिल्म इंडिस्ट्रीमधून पूर्णपणे बंदकेले आहे. यासाठी सेटच्या निर्मितीमध्येदेखील याचा वापर केला गेला नाही.  

उत्सवाच्या थीमची घेतली गेली काळजी... 
दैनिक भास्करसोबत बातचीतीमध्ये ओमंग कुमारने सांगितले, "मी या शोसोबत जोडल्या गेल्यामुळे खूप खुश आहे. मंचाच्या निर्मितीसाठी ज्या साहित्याचा उपयोग केला गेला आहे, ती पूर्णपणे पर्यावरणाला अनुकूल आहे. ग्लिट्ज आणि ग्लॅमरस  आणण्यासाठी प्लायवुड, स्टील, फायबर, अॅक्रॅलिकचा उपयोग केला आहे. लायटिंग खूप महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे, कारण हा रिअॅलिटी शो आहे. मंचाच्या बॅकग्राउंडमध्ये अनेक एलईडी स्क्रीन आहेत. या उत्सवाची थीम लक्षात ठेऊन तयार केले गेले आहे." 

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, फिनालेमध्ये शोच्या तिन्ही जज अलका याज्ञनिक, जावेद अली आणि हिमेश रेशमियादेखील परफॉर्म करणार आहे. तसेच कृष्णा अभिषेक आणि कीकू शारदा कॉमेडीचा तडका लावताना दिसणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...