आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या सिमवरून मुलास कॉल अन् लागला खुन्याचा सुगावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा धारदार शस्त्राने खून करून दुचाकीवरून पळालेल्या पतीस मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. बाळासाहेब शिंदे (६५, रा. राजनगर) असे आरोपीचे नाव असून शनिवारी त्याला वलसाडजवळून (गुजरात) अटक करण्यात आली. नवीन सिमवरून मुलाला केलेल्या कॉलमुळे त्याला पकडणे शक्य झाले. 


महिनाभर तो भटकत होता. नवसारीजवळील डोंगरात त्याने फेकलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली. बाळासाहेब याने २५ सप्टेंंबर रोजी मध्यरात्री पत्नी ज्योतीची निर्घृण हत्या केली होती. शस्त्राने वार केल्यानंतर पत्नीचा गळा दाबत तिला घरासमोरील नाल्यात फेकले होते. घरातील लहान मुलासमोर त्याने हे कृत्य केले होते. यानंतर फरार झालेल्या बाळासाहेबने दुचाकीवरूनच गुजरात गाठले. महाराष्ट्र-गुजरात सीमेलगत नवसारी घाटात त्याने दुचाकी फेकून दिली. सारीगाम (जि. वलसाड) इथे एका कंपनीत चार-पाच दिवसांपूर्वीच तो लागला होता.

 

मार्गांनी पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते. दरम्यान, नवीन सिमवरून कॉल केल्यामुळे पोलिसांना आणखी एक सुगावा मिळाला होता. त्याचा ठावठिकाणा समजताच पथकाने शनिवारी अटक करून शहरात आणले. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे भदरगे यांनी सांगितले. त्याने नवसारी भागात फेकलेली दुचाकी देखील जप्त केली. 


दुचाकीवरून गाठले गुजरात 
लग्नापूर्वी गुजरातमधील सर्कशीत तो १५ वर्षे काम करत होता. हातून खून झाल्यानंतर तो दुचाकीवरूनच गुजरातेत पोहोचला. दरम्यान त्याने नवीन सिमकार्डही घेतले होते. या क्रमांकावरून त्याने मोठ्या मुलाला कॉल केला. त्यामुळे त्याचा सुगावा लागला. दरम्यान, ज्योतीचे कुणाशीही संबंध नसल्याचे तपासात स्पष्ट झाले, असे निरीक्षक जाधव म्हणाले. बाळासाहेब व ज्योती यांच्या वयात २० वर्षांचे अंतर होते. मुकुंदवाडीत स्थायिक झाल्यानंतर दोघेही घरोघरी जाऊन रुग्णसेवा देत होते. बाळासाहेब नेहमी ज्योतीवर संशय घेत होता. २५ सप्टेंबर रोजी दुचाकीच्या वाढलेल्या रिडींगवरून दोघांत वाद झाला. याच रागातून त्याने ज्योतीचा खून केला.

बातम्या आणखी आहेत...