आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Number Of Candidates Has Dropped By 23 Per Cent In Seven Years, But The Stigma Has Increased

उमेदवारांच्या संख्येत सात वर्षांत 23 टक्क्यांनी घट, पण कलंकित वाढले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. पक्ष नाव आणि कामाच्या बळावर मते मागू लागले आहेत. परंतु ज्या उमेदवारांच्या नावे मते मागितली जात आहेत, त्यापैकी अनेक जणांवर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. धक्कादायक म्हणजे अशा उमेदवारांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. २००८ ते २०१५ दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण २३ टक्क्यांनी घटले. परंतु गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचे प्रमाण ३ टक्क्यांनी वाढले. २००८ मध्ये असे काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार रिंगणात होते. २००८ मध्ये हा विक्रम भाजपच्या नावावर गेला. आश्चर्य म्हणजे २०१३ ते २०१८ दरम्यान सत्ताधारी आम आदमी पार्टीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचे प्रमाण ५ टक्क्यांनी वाढले. ही माहिती निवडणूक सुधारणा व प्रक्रियेवर देखरेख ठेवणारी संस्था एडीआरच्या ताज्या अहवालातून जाहीर झाली आहे.

भाजपमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक उमेदवार

२००८ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक ६७ उमेदवार काँग्रेसकडे होते. तेव्हा भाजप-६३, बसपाचे ६४, सपाचे ३१, लोजपचे ३७, राष्ट्रवादीचे १५ अशी स्थिती होती. २०१५ च्या निवडणुकीत अशा उमेदवारांच्या संख्येत घट झाली. परंतु त्यात सर्वाधिक ३१ उमेदवार भाजपचे होते. काँग्रेस-१५, बसपा-१४ व जदयू-८, आप-५ उमेदवारांवर खटला दाखल होता.

पक्ष : 2008 : 2013 : 2015


भाजप : 35% : 46% : 39%
काँग्रेस : 30% : 21% : 30%
आप : 0% : 7% : 33%
बसपा : 23% : 21% : 17%
जदयू : 9% : 30% : - : -
लोजपा : 22% : 25% : - : -

  • 2015 मध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे २४ (३४%) उमेदवार विजयी होऊन गेले होते विधानसभेत

२०१३ ते २०१५ दरम्यान आम आदमी पार्टीत गुन्हेगारी प्रकरणे

२००८ च्या निवडणुकीत एकूण ७९० उमेदवारांत १११ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार होते. २००८ मध्ये हे प्रमाण १६ टक्क्यांनी घटत १२९ वर गेले. एकूण उमेदवारांचे प्रमाण २ टक्क्यांनी वाढले. २०१५ मध्ये एकूण उमेदवारांचे प्रमाण १५ टक्क्यांनी घटले आहे. परंतु गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचे प्रमाण १७ टक्क्यांनी वाढले.

निवडणूक : एकूण : कलंकित : प्रमाण


2008 : 790 : 111 : 14%
2013 : 796 : 129 : 16%
2015 : 673 : 114 : 17%

  • 2015 मध्ये ११ % उमेद्वारांवर दाखल होते गंभीर गुन्हे.

बसपात कलंकित कमी

२००३ ते २०१५ या दरम्यान गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवारांची संख्या प्रत्येक पक्षात वाढली. परंतु मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पार्टीमध्ये अशा उमेदवारांची संख्या दरवर्षी कमी होत गेली. अशा प्रकारचा बसपा हा एकमेव पक्ष ठरला. २००८ मध्ये पक्षात २३ टक्के उमेदवार होते. २०१३ मध्ये २१ टक्के झाले. २०१५ मध्ये हे प्रमाण १७ टक्के होते.