आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ड्राय डे’ ची संख्या कमी होणार :  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर  - ‘ड्राय डे’ बाबत संपूर्ण राज्यासाठी एकत्रित धोरण आणण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न असून त्यात ड्राय डेचे दिवस कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.


प्रत्येक जिल्ह्यात उत्सव व सण विचारात घेऊन ड्राय डे निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. मात्र, आता संपूर्ण राज्यासाठीच एकत्रित ड्राय डे चे दिवस निश्चित करण्यात येत आहे. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतले जातील, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. या धोरणात ड्राय डे चे दिवस कमी होऊ शकतात, असे ते म्हणाले.


ड्राय डे चे दिवस प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे आहेत. त्यामुळे दारु विक्रेत्यांना समस्या येत आहेत. याशिवाय राज्य शासनाचा महसूल बुडत असल्याने हे धोरण आणले जाणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ््यांना वाटते. ड्राय डे पाळण्यावरून अलीकडेच काही वादही झाले आहे. वाद न्यायालयात पोहोचले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा निर्णय घेतला असल्याचेही मानले जात आहे.