आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेऊल - चीनच्या बाहेर दक्षिण कोरियातील कोरोना बाधितांची संख्या १ हजारावर पोहोचली आहे, अशी माहिती राष्ट्रपती मून जे-इन यांनी दिली आहे. मंगळवारी नवीन १४४ बाधित आढळून आले. चीनबाहेरील बाधितांची ही सर्वात मोठी संख्या आहे.
वास्तविक जगातील १२ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था अशी ओळख असलेल्या दक्षिण कोरियात त्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. देशातील चौथे मोठे शहर देएगू व शेजारील गेआँग शहरात हा संसर्ग वाढल्याचे सांगण्यात आले. परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. देएगू शहराची लोकसंख्या सुमारे २५ लाख आहे. येथील मेडिकल दुकानांवर मास्कसाठी रांगाच रांगा लागल्याचे दिसून येत आहे.
कोरियन एअर या कंपनीच्या विमानातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्या कर्मचाऱ्याबद्दलचा तपशील मात्र देण्यात आला नाही. अमेरिकेने नागरिकांना दक्षिण कोरियाचा शक्य असल्यास रद्द करण्याचा सल्ला दिला आहे.
चीनमध्ये मृतांची संख्या २६६३
चीनमध्ये कोरोनामुळे मृतांची संख्या २ हजार ६६३ वर पोहोचली. सुमारे ७७ हजार ६५८ जणांना विषाणूची बाधा झाल्याच्या वृत्तास दुजोरा देण्यात आला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ३१ प्रांतांतील कोराेना संसर्गाच्या स्थितीबद्दलची माहिती स्पष्ट केली. त्यानुसार २७ हजार २०० लोक बरे होऊन घरी परतले. चोवीस तासांत कोरोनाची बाधा झालेले नवीन ५०८ प्रकरणे समोर आले आहेत.
संसदेने सत्र केले रद्द
कोरोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे दक्षिण कोरियाच्या संसदेने मंगळवारचे सत्र रद्द केले. गेल्या आठवड्यात बैठकीत कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीने हजेरी लावली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.