Home | Business | Business Special | The number of people declaring more than 100 crores in the country increased by 61%

देशात 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न घोषित करणाऱ्यांची संख्या 61% वाढली 

वृत्तसंस्था | Update - Feb 10, 2019, 09:17 AM IST

२०१७-१८ मध्ये संख्या वाढून ६१ झाली, वर्षापूर्वी ३८ होती 

  • The number of people declaring more than 100 crores in the country increased by 61%

    नवी दिल्ली- देशात १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न घोषित करणाऱ्यांची संख्या ६१ टक्क्यांनी वाढली आहे. असेसमेंट इयर २०१७-१८ मध्ये एकूण ६१ लोकांनी त्यांचे उत्पन्न १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती दिली आहे. या आधीच्या वर्षी म्हणजेच २०१६-१७ मध्ये अशी घोषणा करणाऱ्यांची संख्या ३८ होती. अर्थ राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, प्राप्तिकर विभागाकडे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असल्याची माहिती देणाऱ्यांच्या संख्येत सलग वाढ होत आहे. वर्ष २०१४-१५ मध्ये अशा करदात्यांची संख्या २४ होती. कोणत्याही व्यक्तीला अब्जाधीश असल्याचे मानण्यासाठी अधिकृत अशी मोजपट्टी नसल्याचे त्यांनी सांगितले.

    आणखी एका दुसऱ्या उत्तरात वित्त राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी सांगितले की, अघोषित संपत्ती व्यवहार कायद्यांतर्गत सरकार कारवाई करत आहे. विविध संस्थांनी या कायद्यांतर्गत ६,९०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. त्यांनी सांगितले की, डिसेंबर २०१८ पर्यंत कर अधिकाऱ्यांनी २,००० निनावी व्यवहारांची यादी तयार केली आहे. यामध्ये बँक खात्यामध्ये जमा रक्कम, जमीन, फ्लॅट आणि दागिन्यांचा समावेश आहे. अशा १,८०० प्रकरणांतील संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे.

Trending