आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 वर्षांत देश सोडणाऱ्यांची संख्या 143 टक्क्यांनी वाढली : अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशाच्या बाहेर राहणाऱ्या भारतीयांची संख्या गेल्या २७ वर्षांत १४३ टक्क्यांनी वाढली आहे. १९९० मध्ये विदेशात राहणाऱ्या भारतीयांची संख्या ९० लाख होती. गेल्या वर्षीपर्यंत यात वाढ होऊन ही संख्या १.७ कोटींपर्यंत पोहोचली आहे, तर दुसरीकडे या दरम्यान भारतातील प्रति व्यक्ती उत्पन्नात ५२२ टक्क्यांची वाढ झाली आहे. हा आकडा १,१३४ डाॅलरवरून वाढून ७,०५५ डॉलर पर्यंत पोहोचला आहे.

 

उत्पन्न वाढल्यामुळे ज्यांना देशात मनासारखी नोकरी मिळत नाही, ते नोकरीच्या शोधात विदेशात जात आहेत. इंडियास्पेंडच्या वतीने संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक प्रकरण विभागाच्या आकडेवारीच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे, तर दुसरीकडे एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी)च्या एका नव्या अहवालानुसार गेल्या सहा वर्षांत विदेशात राहणाऱ्या अकुशल भारतीयांच्या संख्येत ३९ टक्क्यांची घट झाली आहे. २०११ मध्ये अशा भारतीयांची संख्या ६.३७ लाख होती. ही २०१७ मध्ये कमी होऊन ३.९१ लाखांवर आली आहे. वास्तविक विदेशात जाणाऱ्यांमध्ये कुशल भारतीयांची संख्या वाढली असा याचा अर्थ होत नाही. उलट कुशल भारतीय देशाच्या बाहेर जात असतील तर त्यावर चिंता व्यक्त करण्याची गरज आहे.  


एडीबीच्या अहवालानुसार, लोकांमध्ये दुसऱ्या देशात जाण्याची प्रवृत्ती आर्थिक तेजीदरम्यान दिसून आली आहे. देशातील उत्पन्न अपर-मिडल इन्कम स्टेटसपर्यंत पोहोचल्यावरच त्यांच्या संख्येमध्ये घट होते. ज्यांना स्वत:च्या देशात नोकरी मिळत नाही त्यांचे देश सोडून विदेशात जाणाऱ्या लोकांचे प्रमाण ७३ टक्के आहे. भारतात नोकरी लायक वयाच्या (१५ ते ६० वर्षे) लोकसंख्येत दर महिन्याला १३ लाख नवीन लोक जोडले जात आहेत. यामुळे देशातील रोजगाराच्या बाजारातील वातावरण आणखीच खराब होत आहे. ज्या प्रमाणात या लोकसंख्येत वाढ होत आहे त्या प्रमाणात रोजगारात वाढ होताना दिसत नाही.

  
कतारमध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या ८०३ पट वाढली : १९९० ते २०१७ दरम्यान सुमारे तीन दशकांत कतारमध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या ८०३ पट वाढली आहे. १९९० मधील २,७३८ च्या तुलनेमध्ये ही संख्या वाढून २२ लाखांपर्यंत गेली आहे. इतर कोणत्याही देशाच्या तुलनेमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. २०१५-२०१७ दरम्यानच कतारमध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या तीन पट वाढली आहे. ओमान (६८८%) आणि संयुक्त अरब अमिरात (६२२%) देखील त्या अव्वल -१० देशात येतात, ज्या देशात २७ वर्षात भारतीयांची संख्या सर्वाधिक वाढली आहे, तर सौदी अरब आणि कुवेतमध्ये २०१७ पर्यंत गेल्या दहा वर्षांत भारतीयांची संख्या अनुक्रमे ११०% आणि ७८% वाढली आहे.

 

भारतीयांसाठी गल्फ, अमेरिका, ब्रिटन आवडते  
गेल्या दशकात खाडी देश, अमेरिका आणि ब्रिटन भारतीयांसाठी सर्वाधिक आवडते देश ठरले आहेत. या देशांत सर्वाधिक भारतीय राहतात. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, न्यूझीलंडसारखे ओईसीडीचे ३४ सदस्य देशांत राहणाऱ्या भारतीयांची संख्या वाढली आहे. म्हणजेच नेदरलँड्स, नॉर्वे आणि स्वीडनमध्ये भारतीयांची संख्या २०१७ पर्यंत गेल्या सात वर्षांत अनुक्रमे ६६ टक्के, ५६ टक्के, ४२ टक्के वाढली आहे.  

 

विदेशात जाणाऱ्यात यूपी अव्वल, बिहार दुसरे  
२०११ ते २०१७ दरम्यान देशात उत्तर प्रदेशातून सर्वाधिक लोक विदेशात गेले आहेत. त्यानंतर बिहार आणि तामिळनाडूचा क्रमांक आहे. केरळमधून विदेशात जाणाऱ्यांची संख्या ६९ टक्क्यांनी कमी झाली आहे. २०११ ते २०१३ दरम्यान त्यांची संख्या ८०,००० होती. ही २०१७ मध्ये कमी होऊन २५,००० वर आली.   

बातम्या आणखी आहेत...