आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- तरुणाला रस्त्यात अडवून नऊ जणांनी जुन्या वादातून तलवार, कुऱ्हाडीने वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ब्रिजवाडी उत्तरानगरी रस्त्यावर हा प्रकार घडला होता. याप्रकरणी २८ नोव्हेंबर रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर मंगेश अशोक साबळे, प्रकाश यादव पाखरे, रवी दिलीप साबळे, यादव पाखरे यांच्यासह पाच महिलांवर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुराग दामोदर जाधव (३२) हे मुलीसह दुचाकीवरून (एमएच २० बीडब्ल्यू ६७५) उत्तरानगरीकडे जात होते. आरोपींनी त्यांचा पाठलाग करून दुचाकी अडवली. मंगेश साबळे याने थेट त्यांच्यावर डोक्यावर तलवारीने वार केला. प्रकाश याने कुऱ्हाडीने वार केले. इतरांनी त्यांना खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले.
घटनेनंतर दोन दिवसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक कैलास अन्नलदास पुढील तपास करत आहेत. दरम्यान, यादव पाखरे याला अटक करण्यात आली असून त्याला ३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.