आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्ध महिलेने कुटुंबातील १६८ सदस्यांच्या उपस्थितीत साजरा केला १०३ वा वाढदिवस; ५ पिढ्यांचा सहभाग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनच्या हंदन भागातील ली जियुझी या वयाेवृद्ध महिलेने ३१ मे राेजी आपला १०३ वा वाढदिवस साजरा केला. या वेळी या महिलेचे संपूर्ण कुटुंब उपस्थित हाेते. या कुटुंबात एकूण १६८ सदस्य आहेत. यामध्ये लीची मुले, नातवंडे, नातवंडांची मुले अशा प्रकारे एकूण जवळपास पाच पिढ्या वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित हाेत्या. ली यांचा नन्हन येथे १९१६ मध्ये जन्म झाला. ली यांची सर्वात माेठी मुलगी ८० वर्षांची आहे. ली ८० वर्षांच्या असताना त्यांचा वाढदिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. ली यांना चार मुले असून ते आलटून  पालटून आपल्या आईची काळजी घेत असतात.


स्मरणशक्ती चांगली
या वयातही ली यांची स्मरणशक्ती चांगली असून त्यांना आपल्या सर्व जुन्या गाेष्टी आठवतात.  कुटुंबातील सदस्य, नातेवाइकांनाही त्या आेळखतात. फक्त त्यांना आता कमी एेकायला येते.