Home | Sports | Other Sports | The oldest race race in America

अमेरिकेतील सर्वात जुनी हाॅर्स रेस :अमेरिकेत दरवर्षी हाेणारी केंटुकी डर्बी हाॅर्स रेस पूर्ण झाल्यानंतर २० मिनिटांनी आला वादग्रस्त निकाल; गैरवर्तनाचा बसला फटका

वृत्तसंस्था | Update - May 07, 2019, 10:36 AM IST

केंटुकी डर्बीच्या १४५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच विजयानंतरही घाेडा गैरवर्तनामुळे अपात्र; दुसऱ्या स्थानावरील कंट्री हाऊस विजेता

  • The oldest race race in America

    केंटुकी - अमेरिकेत दरवर्षी घाेड्यांची केंटुकी डर्बी रेस आयाेजित करण्यात येते. या रेसच्या आयाेजनाला १८७५ मध्ये सुरुवात करण्यात आली. त्यामुळे ही सर्वात जुनी हाॅर्स रेस मानली जाते. मात्र, यंदाच्या रेसमध्ये वादग्रस्त निकाल लागला आहे. यामध्ये मॅक्झिमम सिक्युरिटी नावाच्या घाेड्याचा विजयानंतरही किताबाचा बहुमान हुकला. केंटुकी डर्बीच्या १४५ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विजेत्या घाेड्याला अपात्र ठरवण्यात आले. जवळपास २ किमीच्या रेसमध्ये मॅक्झिमम सिक्युरिटी आणि त्याचा जाॅकी लुईस साएज हे सुरुवातीपासूनच फेव्हरेट हाेते. त्यांनी लाइनही क्राॅस केली. मात्र, तत्काळ वाॅर आॅफ व्हील घाेड्याच्या जाॅकीने आणि इतरांनी व्यवस्थापनाकडे तक्रार नाेंदवली. रेसदरम्यान मॅक्झिमम सिक्युरिटी या घाेड्याने आमचा रस्ता राेखला आणि आमच्याच लेनमध्ये अडसर आणला. त्यामुळे या वादाला ताेंड फुटले. तब्बल दीड लाख चाहत्यांनी आपल्या उघड्या डाेळ्यांनी स्पर्धेचा विनरही पाहिला. मात्र, अधिकृत असा निकाल राेखण्यात आला. स्टिवाॅर्ड‌्स रेसचे फुटेज पाहतच राहिले. यात मॅक्झिमम सिक्युरिटीने दाेन वेळा वाॅर आॅफ व्हीलचा रस्ता राेखला. धावताना अडसर निर्माण केला. याशिवाय त्याने चुकीच्या लेनमध्येही प्रवेश केला हाेता. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर असलेल्या कंट्री हाऊस घाेड्याला विजेता घाेषित करण्यात आले.

    अशा प्रकारे झाला मॅक्झिममचा पराभव

    मॅक्झिमम हा सर्वात आघाडीवर हाेता. त्याच्यामागेे वाॅर ऑफ व्हील आपल्या लेनवर हाेता. तेव्हा मॅक्झिममने अडसर केला.

    मॅक्झिमम हा वाॅर ऑफ व्हीलच्या लेनमध्ये घुसला आणि त्याने त्याला स्पर्श करून आघाडी घेतली. त्याचा फटका इतर दाेघांनाही बसला.

Trending