आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Only Intercontinental Swimming Race In Turkey, Starting From The Asian Coast And Ending On The European Coast

तुर्कीमधील एकुलती एक इंटरकॉन्टिनेंटल स्वीमिंग रेस, एशियन किनाऱ्यावरून सुरु होते आणि यूरोपियन किनाऱ्यावर संपते 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : तुर्कीच्या इस्तांबुलमध्ये रविवारी 31वी बोसफोरस क्रॉस-कॉन्टिनेंटल स्वीमिंग रेस झाली. यामध्ये जगभरातील 2400 खेळाडूंनी भाग घेतला होता. यामध्ये 1200 स्पर्धक तुर्की येथीलच होते. ही रेस वॉटरवेच्या एशियन किनाऱ्यापासून सुरु होऊन यूरोपियन किनाऱ्यावर संपते.  

 

6.5 किमीच्या या रेसला जगातील सर्वात श्रेष्ठ ओपन वॉटर स्वीमिंग रेस म्हणले जाते. ही जगातील एकुलती एक इंटरकॉन्टिनेंटल स्वीमिंग रेस आहे. 10 तासांची ही रेस कनीला पियरपासून सुरु झाली आणि बोस्फोरस पार करून कुरुकेसमेमध्ये समाप्त झाली. 

 

14 ते 89 वयाचे स्पर्धक घेतात सभाग... 
रेसमध्ये 14 ते 89 वर्षांच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यासाठी इस्तांबुलने आपले शिपिंग ट्राफिक एका दिवसासाठी बंददेखील ठेवले होते. रेस पहिल्यांदा 1989 मध्ये झाली होती. तेव्हा 64 पुरुष आणि 4 महिला स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते.