आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कागदी विमान बनवता येत नाही त्यांना विमान बनवण्याचे काम दिले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओझर : लढाऊ विमाननिर्मिती करणाऱ्या देशभरातील एकूण नऊ विभागांतील २० हजार कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (दि. १४) संपावर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर कामगारांकडून देशाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या या कामगारांना सरकारला न्याय देता येत नाही, ही बाब दुर्दैवी अाहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी नाशकात केली. देशाच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांनी कधी इतकी टोकाची भूमिका यापूर्वी घेतली नव्हती. केंद्र सरकारने फ्रान्सकडून राफेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. राफेल चांगले पण सुखोई सरस असल्याचे सांगत ज्यांना कागदी विमान बनवता येत नाही, त्यांना सरकारने विमान बनवण्याचे काम दिले, असा टोलाही त्यांनी लगावला. निवडणुकीनंतर देशभरातील एचएएल कामगार संघटनेच्या प्रतिनिधींसह मी केंद्रीय संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. वेतन करार वाढीसंदर्भात एचएएल कामगार संघटनेने संप पुकारला आहे. संपाच्या पाचव्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, छगन भुजबळ यांनी संपकरी कामगारांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी पवार यांनी चीन युद्धानंतर देशाची संरक्षण व्यवस्था सक्षमीकरणासाठी एचएएलची निर्मिती केली. देशाच्या संरक्षणाची गरज भागवून जगाला अन्य गोष्टी पुरवण्याचे कामदेखील तत्कालीन सरकारने केले होते. एचएएलने सुखोई बनवण्याचे काम यशस्वी केल्यानंतर भारतीय वायुसेनेच्या कामगिरीत सुखोईची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे त्यांनी सांगितले. देशसेवा करणाऱ्या कामगारांना सरकारला न्याय देता येत नाही, केंद्र सरकारने अनुकूल निर्णय न घेतल्याने उद्योगांची अवस्था वाईट झाल्याचा आरोप करत आपण संरक्षणमंत्री असताना किती वर्षे काम मिळेल याचा अभ्यास करूनच एचएएलला काम दिल्याचे सांगितले. अाता एचएएलसह उद्योग क्षेत्रात कामगारांची संख्या कमी होत आहे. परंतु, अधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे, हे अनुकूल नाही. कामगारांची मागणी रास्त असून निवडणुकीनंतर यात लक्ष घालणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या वेळी आमदार छगन भुजबळ, आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार दिलीप बनकर, कामगार नेते रामू जाधव, भानुदास शेळके, सचिन ढोमसे, अनिल मंडलिक, संजय कुटे, राजेंद्र शिंदे यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांत आहोत, शांत राहू द्या; कामगार संघटनांचा आरोप संप सुरू झाल्यापासून व्यवस्थापनाकडून पोलिस यंत्रणेचा वापर करून शांततेत सुरू असलेल्या संपाला डिवचले जात असल्याची माहिती कामगारांकडून देण्यात आली. शांततेत सुरू असलेल्या संपात कामगारांच्या भावनांच्या उद्रेक झाला तर संपाची तीव्रता वाढवण्यात येऊन होणाऱ्या परिणामांची जबाबदारी व्यवस्थापनाची असेल, असे कामगारांकडून सांगण्यात आले.