आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षाने गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला अध्यक्ष करावे : राहुल, पण कार्यकारिणीने राजीनामा फेटाळला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी शनिवारी अध्यक्षपदाच्या राजीनामा दिला. मात्र, काँग्रेसच्या कार्यकारिणीने तो स्वीकारण्यास नकार दिला. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी राजीनामा देण्यावर ठाम आहेत. सुमारे साडेतीन तास चाललेल्या बैठकीनंतर कार्यकारिणीने राहुल यांना संघटनात्मक सर्व बदलाचे अधिकार दिले. सूत्रांंनी सांगितले, अपेक्षेप्रमाणे निकाल न देण्याबाबत राहुल यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, पक्षाने आता काँग्रेसच्या घराण्याबाहेरील व्यक्ती अध्यक्ष म्हणून शोधावा. रात्री उशिरापर्यंत राहुल यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी मनधरणी सुरू होती. राहुल यांनी ऐकले नाही तर पुढील आठवड्यात पक्षाची सर्वसाधारण सभेची बैठक घेऊन तीत आपला निर्णय बदलण्याची मागणी केली जाऊ शकते. पक्षातील ज्येष्ठ नेते या मुद्द्यावर बोलणे टाळत आहेत. दरम्यान, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम म्हणाले की राहुल यांनी राजीनामा दिल्यास दक्षिणेतील काँग्रेस कार्यकर्ते आत्महत्या करतील.