आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआघाडीत ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांनाच जि.प. अध्यक्षपद, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पक्षादेश न डावलण्याचे मंत्री भुजबळांचे आवाहन

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नाशिक : महाविकास आघाडीत ज्या राजकीय पक्षांचे संख्याबळ अधिक आहे. त्याच पक्षाच्या उमेदवारांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पक्षादेश डावलू नये, असे आवाहन ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक २ जानेवारी राेजी हाेणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचा पॅटर्न वापरून सत्ता स्थापन करण्यात आली असून, त्याच धर्तीवर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीतही हाच पॅटर्न वापरण्यात येणार आहे. ग्रामविकासमंत्री भुजबळ म्हणाले, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांनाच अध्यक्षपद देण्याचे निश्चित केले आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर असलेल्यांना उपाध्यक्षपद दिले जाईल. त्यानंतर विविध समित्यांची पदे दिली जातील.

ज्येष्ठता पाहिली जाणार

या पदांसाठी सामाजिक व भाैगाेलिक स्थितीचा अभ्यास करतानाच ज्येष्ठता बघितली जाईल. स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते याबाबतचा निर्णय घेतील असेही भुजबळांनी स्पष्ट करतानाच या निवडणुकीत वेगवेगळी आमिषे दाखवली जातील. मात्र, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी काेणत्याही प्रलाेभनाला बळी न पडता पक्षादेशाचे पालन करावे, असे आवाहनही केले.
 

बातम्या आणखी आहेत...