आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोनवर नागरिकत्व कायद्याविषयी बोलणे प्रवाशाला पडले महागात; कॅब चालकाने गपचुप केला पोलिसांना फोन, नंतर झाले असे...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
प्रदर्शनादरम्यान बप्पादित्य सरकार - Divya Marathi
प्रदर्शनादरम्यान बप्पादित्य सरकार
  • कवी-कार्यकर्ते बप्पादित्य सरकार यांना पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले

मुंबई- सुधारीत नागरिकत्व कायद्यावर बोलणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. मुंबईत कॅबमध्ये बसलेले कवी-कार्यकर्ते बप्पादित्य सरकार कॅबमधून जात असताना फोनवर नागरिकत्व काद्यावर बोलत होते. यादरम्यान, कॅब चालकाने पोलिसांना फोन बोलवून बप्पादित्य देशाला जाळण्याची भाषा करत असल्याचे सांगितले. घटना बुधवारी घडली. ऑल इंडिया प्रोग्रेसिव वुमंस असोसिएशनच्या सचिव कविता कृष्णन यांनी गुरुवारी घटनेची माहिती ट्वीट करुन सांगितली.

कृष्णन यांनी ट्वीट केलेल्या कथित वक्तव्यानुसार, बप्पादित्य सरकार बुधवारी रात्री जुहूवरुन कुर्लाकडे उबर कॅबने जात होते. प्रवासादरम्यान ते फोनवर आपल्या मित्राला दिल्लीतील शाहीन बागमध्ये दिलेल्या ‘लाल सलाम'च्या घोषणांबद्दल बोलत होते. हे ऐकत असलेल्या कॅब चालकाने एटीएममधून पैसे काढायचे असल्याचा बहाणा करुन कार थांबवली. त्यानंतर चालकाने पोलिस घेऊन आला. पोलिसांनी बप्पादित्य यांच्याकडे चौकशी केली. यानंतर बप्पादित्य यांनी पोलिसांना सांगितले की, ते जयपूरवरुन आले आहेत आणि मुंबईथ होत असलेल्या सीएएविरोधी प्रदर्शानत गेले होते. यादरम्यान कथिररित्या चालकाने पोलिसांना सांगितले की, तो एक कम्युनिस्ट आहे आणि देशाला जाळण्याची भाषा वापरत होता, त्यामुळे त्याला अटक करा. त्यानंतर बप्पादित्य यांना पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले, पण ट्वीटमध्ये कोणत्या परिसरातील पोलिस स्टेशन आहे, याचा उल्लेख नाही. कॅब चालकाने कथितरित्या हेदेखील बप्पादित्य यांना हदेखील सांगितले की, त्यांनी माझे आभार मानावे. मी त्यांना इतर कुठे न नेता थेट पोलिस स्टेशनमध्ये आणले आहे. ट्वीटमध्येहदेखील सांगण्यात आले आहे की, पोलिसांनी बप्पादित्य यांच्यासोबत चांगला व्यवहार केला आणि रात्री अंदाजे 1 वाजता कम्युनिस्ट कार्यकर्ते एस गोहिल पोलिस स्टेशनमध्ये पोहचले आणि बप्पादित्य यांना घेऊन गेले. कृष्णन यांच्या ट्वीटनुसार सध्या वातावरण चांगले नसल्यामुळे पोलिसांनी बप्पादित्य यांना ‘डफली' सोबत न ठेवण्याची आणि लाल स्कार्फ न घालण्याचा सल्ला दिला आहे. कविता कृष्णन यांनी ट्वीटमध्ये मुंबई पोलिस आणि उबरला टॅग केले आहे. यावर पोलिसांनी त्यांना संपूर्ण घटना सांगण्यास सांगितले आहे. तसेच, टि्वटर हँडल ‘उबर इंडिया सपोर्ट'ने घटनेचे गांभीर्य जाणून यावर योग्य कारवाई करणार असल्याचे सांगितले.  

बातम्या आणखी आहेत...