आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कड्यावरून चालण्याची हौस; तरुण 250 फूट दरीत काेसळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -  रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी पुण्याजवळील सिंहगडावर आलेल्या युवकाने अतिउत्साहाच्या भरात गडावरील कड्यावरून चालण्याचा प्रयत्न केला. मात्र तोल जाऊन ही व्यक्ती सुमारे अडीचशे फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने उतारावरील एका झाडाच्या फांदीवर अडकल्याने ही व्यक्ती वाचली. मात्र त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती हवेली पोलिसांनी दिली.

 

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार प्रकाश दळवी (वय ३५) हे  रविवारी सिंहगडावर गेले हाेते. गडावरची वहिवाटीची मार्गिका सोडून ही व्यक्ती गडावरील कड्यावरून चालण्याचा प्रयत्न करत होती. सुरुवातीला ही व्यक्ती सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात आहे असे वाटले, पण कड्याच्या टोकावरून चालण्याचे थ्रिल दाखवण्याची खुमखुमी दळवी यांच्या अंगलट आली. कड्यावरून चालण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याने ते अडीचशे फूट खोल दरीत कोसळले...  सुदैवाने एका झाडाच्या फांदीवर अडकल्याने ते वाचले. ग्रामस्थ, वनरक्षक आणि सुरक्षा रक्षक तसेच रेस्क्यू टीमने दरीत दोरखंड सोडून दळवी यांना जखमी अवस्थेत वर काढले.

बातम्या आणखी आहेत...