आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Philippines, MacArthur Competition, Longest Homing Pigeon Race, Challenging For The Birds Tense Affair For The Owner

याठिकाणी भरते 600 किलोमीटर लांबीची कबूतरांची शर्यत, कबुतरांच्या शौकीन लोकांमुळे जातो 90 टक्के पक्षांचा प्राण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनीला(फिलीपीन्स)- येथे कबूतरांच्या शर्यतीसाठी 'मॅकऑर्थर' स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ही शर्यत सुमारे 600 किलोमीटर लांबीची असते. या शर्यतीत लांब समुद्री मार्ग, गरमी, शिकारी पक्षी आणि अपहरणकर्त्यामुळे कबूतरांना जीवाचा धोका असतो. या स्पर्धेचे आयोजक नेलसन चुआ यांनी सांगितले की, ही स्पर्धा फिलीपीन्सचे प्रमुख आकर्षण असून वेगाने इतर आशियाई देशातही आता लोकप्रिय होत आहे. यामध्ये भारत, चीन आणि तायवान या देशांचा समावेश आहे.


ही स्पर्धा 'लेइटे' बेटापासून मॅकआर्थर शहरापर्यंत असते. विशेष म्हणजे फक्त 10 टक्के पक्षीच ही शर्यत पुर्ण करण्यात यशस्वी होतात. 50 ते 70 टक्के कबूतर जाळ्यात अडकतात किंवा शिकाऱ्यांद्वारे मारले जातात. या स्पर्धेला पाठिंबा देणारे फिलीपीन्समध्ये आज हजारो सदस्यांचे 300 क्लब आहेत.

 

9.8 कोटी रूपयांपर्यंत कबूतरांची किंमत
देशातील सर्वात लांब असणाऱ्या या शर्यतीचा कालावधी कबूतर आणि त्यांना पाळणाऱ्यांसाठी खूप जोखीमेचे काम असते. कबूतर पाळणारे  जायमे लिन यांच्या माहितीनुसार, येथे यूरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत पक्षांची जास्त शिकार होते. फिलीपीन्समध्ये लोक कबुतरांना मारण्याचा प्रयत्न करतात. आपल्या आवडत्या कबूतरांची बोली डॉलरमध्ये लावली जाते. त्यामुळे यांना पर्वतांवर जाळे लावून पकडले जाते. पण यादरम्यान पक्षांचे अपहरण होणे एक सर्वसाधारण गोष्ट आहे. अपहरण केल्यानंतर कमी दरात कबुतरांच्या शौकीन लोकांना हे पक्षी विकले जातात. मार्चमध्ये एका चीनी खरेदी करणाऱ्याने लिलावात बेल्जिअमच्या सर्वश्रेष्ठ लांब शर्यतीच्या कबूतराला रेकॉर्ड 9.8 कोटी रूपयांमध्ये खरेदी केले होते. 

 

बेल्जिअम कबूतरांच्या शर्यतींचा गड
या शर्यतीची सुरूवात बेल्जिअमपासून झाली. अशा प्रकारची शर्यत 1818 मध्ये झाली होती. आजसुद्धा बेल्जिअममध्ये अशा शौकीन लोकांचे भरपूर क्लब्स आहेत. एक हजार सदस्य असणाऱ्या मॅट्रो मनीला फॅन्सिअर्स क्लबचे अधिकारी एडी नोबेल यांनी सांगितले की, काही लोकांसाठी हा जुगार खेळण्यासारखे आहे. पण लोकांमध्ये या गोष्टीचे जास्त आकर्षण असते की, कबूतर आपल्याच घरी परत कसे येते.
 
कबूतरांच्या स्मरणशक्तीवर वैज्ञांनिकांचे मत
कबूतराच्या रस्ता लक्षात ठेवण्यावर विज्ञानाचा सिद्धांत सांगतो की, कबूतर उडताना जमिनीचा मॅग्नेटिक भाग निवडतात. त्यांची वास घेण्याची क्षमता खूप तीव्र असते. तर दुसरा सिद्धांत सांगतो की, हे पक्षी अल्ट्रा-लो फ्रीक्वेंसीचे साउंड वेब्सचा वापर करून मार्ग सापडत असतात. मॅकआर्थर स्पर्धेमध्ये त्यांच्या याच गुणांची परीक्षा घेतली जाते. शर्यत पूर्ण होण्यासाठी जवळपास 10 तास लागतात, जे कबूतर परत येण्यात यशस्वी होतात ते सरळ आपल्या मालकाच्या घरी जातात. नंतर मालक पक्षाच्या पायात बांधलेला कोड आयोजकांना देतो. यानंतर विजेतेपद देण्यात येते.

 

शौक पुर्ण करण्यासाठी पक्षांचा घेतला जातो जीव
पक्षांसाठी काम करणाऱ्या मनीला संस्थेच्या, 'पीपल फॉर द अॅथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनीमल्सची ऐश्ले फ्रूनो यांनी सांगितले की, या शर्यतीत 90% पक्षांच्या मृत्यूला आयोजकच जबाबदार आहेत. ही शर्यत तीन-तीन दिवस समुद्रावर घेतली जाते. त्यामुळे पक्षांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होतो. अशा गोष्टीला आपण खेळ म्हणूच शकत नाही, हे सर्व लोक फक्त पैशांसाठी हा खेळ करतात.

बातम्या आणखी आहेत...