आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपल्याच राखेतून जन्म घेणाऱ्या फिनिक्सचा आवेग

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवनीत गुर्जर 


फीनिक्स पक्षी प्रत्येक वेळी आपल्या राखेतून नवा जन्म घेतो. हा एक काल्पनिक पक्षी असल्याचे सर्वांना माहित आहे. असं सांगितलं जातं, की जेव्हा या पक्ष्याचं आयुष्य संपत येतं, तेव्हा तो लाकडे गोळा करुन त्या शिगेवर बसतो आणि सुंदर स्वरलहरी छेडतो. त्याच्या चोचीच्या छिद्रांतून आग बाहेर पडते आणि तो ज्यावर बसला आहे, ती लाकडे जळू लागतात. त्या आगीत तो जळून जातो. पावसाचे थेंब जेव्हा त्या ढिगावर पडतात, तेव्हा आपल्याच राखेतून पुन्हा एक नवा फीनिक्स निर्माण होतो.

महाराष्ट्रातील ताज्या घटनाक्रमात शरद पवार आणि शिवसेनेनेही आपण या फीनिक्स प्रजातीचे असल्याचे सिद्ध केले. अजित पवार आणि फडणवीसांचे सरकार बनल्यावर शरद पवार आणि शिवसेनेने हार मानली नाही, उलट तावून-सुलाखून स्वत:ला मजबूत केले, म्हटलं तर आपल्यालाच पुनरुज्जीवित केले. राखेतून पुन्हा उभे राहिले. एका नव्या रुपात पुढे आले आणि जे जवळपास असंभव वाटत होते ते करुन दाखवले. असंभव यासाठीच म्हणायचे की अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या शक्तीशी दोन हात करणे आणि लढत राहणे, हे सोपी गोष्ट नव्हती.

भाजपचाच विचार करायचा, तर लागोपाठ काही राज्यांत या पक्षाचे फासे उलटे पडू लागले आहेत. किंवा असेही म्हणता येईल की त्यांचे राज्यांमधील नेतृत्व कमकुवत होताना दिसू लागले आहे. याच कमजोर अवस्थेमुळे पक्षात राज्य स्तरावर चुकीचे निर्णय होत आहेत. वास्तविक, स्थानिक कार्यकारिणीवर विश्वास ठेवण्याशिवाय केंद्रीय नेतृत्वापुढे पर्यायही नसतो. असो. पण, ताज्या घटनांतून हे स्पष्ट झाले आहे की राष्ट्रीय मुद्यांच्या भरवशावर राज्ये जिंकणे आता कठीण होत जाईल. राज्यांमध्ये आता स्थानिक मुद्देच चालतील. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाला मजबूत करावेच लागेल.

मध्यरात्री राष्ट्रपती राजवट हटवणे, राज्यपालांकडून सरकार बनवण्याचे आमंत्रण दिले जाणे आणि शपथही दिली जाणे हे सगळे ज्या पद्धतीने केले गेले, ते तसे पहिल्यांदाच होत होते; शिवाय अत्यंत आश्चर्यजनकही होते. शिवसेना स्वत:चे सरकार बनवण्यासाठी इरेला पेटली होती, तोवर राज्यातील वातावरण आणि लोकांची सहानुभूती भाजपसोबत होती. कारण भाजपपेक्षा निम्म्या जागा मिळूनही मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणे, हा युतीचा धर्म नव्हता. पण, भाजपने रातोरात सरकार बनवून सगळे वातावरण आपल्या विरोधात नेऊन ठेवले. मग हे सरकारही वाचले नाही. त्यामुळे अडचणीत आणखी भर पडली. उलट ज्या शिवसेनेने सत्तेसाठी युती तोडली, ती अधिक मजबूत होऊन पुढे आली, तिला लोकांची सहानुभूतीही मिळाली. महाराष्ट्रातील या घटनाक्रमाने सर्वच पक्षांना काही ना काही धडा शिकवला आहे.

नवनीत गुर्जर नॅशनल एडिटर, दैनिक भास्कर
 

बातम्या आणखी आहेत...