आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीच्या तेलाची मध्यप्रदेशात बेभाव विक्री; एजन्सी घेण्यासाठी फोन आला अन् ते चोरटे पकडले गेले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- येथून विठ्ठल सोया ब्रॅन्डचे तेल मध्यप्रदेशातील चोरट्यांनी ट्रकमधून चोरले होते. हे तेल ते उज्जैन जिल्ह्यातील धार जवळील अझमेरा येथे विकत होते. कमी किमतीत तेल मिळते म्हणून व्यापाऱ्याने तेलाच्या पॅकेटवरील फोनवर संपर्क साधला. एजन्सी पाहिजे असे त्याने सांगितले. तेल धारमध्ये गेल्याचे लक्षात येताच, कंपनी मालकाने जुने शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिस अझमेरा येथे गेले. ग्राहक बनून विठ्ठल कंपनीचे तेल मंदिरात चढवायचे असल्याचे सांगून पोलिसांनी तेल मागितले. अन् चोरी पकडली.

 

चोरट्याकडून पोलिसांनी दोन लाख ४० हजाराचे तेल जप्त केले. २८ नोव्हेंबरला वाशीमच्या रुहाटीयांचा विठ्ठल सोयाबीन तेल, काजूच्या ३० डब्यांचा ट्रक उभा होता. चोरट्यांनी तो चोरला चहापत्ती कारखान्याजवळ त्यातील साडेबारा लाखाचे तेल चोरून नेले. या प्रकरणी जुने शहर ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर हे तेल चोरट्यांनी कमी भावात धार येथील व्यापाऱ्यांना विकले. कमी भावात तेल मिळते म्हणून व्यापाऱ्याने तेलाच्या पाकिटावरील फोन नंबरवर संपर्क साधून एजन्सी घ्यायची असे सांगितले. मध्यप्रदेशात एजन्सी दिली नसताना तेथे तेलाची विक्री कशी होते, म्हणून त्यांना संशय आला. त्यांनी हे जुने शहर पोलिसांना सांगितले. ठाणेदार अन्वर एम. शेख यांनी पीएसआय दिलीप पोटभरेंची टीम धारला पाठवली. तेथे व्यापाऱ्याच्या दुकानात पोलिस ग्राहक बनून गेले. त्याला विठ्ठल ब्रॅन्ड तेल मागितले. व्यापारी हे तेल देण्यास मागेपुढे करीत असल्याचे कळल्यानंतर विठ्ठल ब्रॅन्डचेच तेल हवे असे सांगितल्याने त्यांना विठ्ठल ब्रॅन्डचे तेल देताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर व्यापाऱ्याने मुख्य आरोपी यतीश जीवनलाल जैन रा. अझमेरा याचे नाव,पत्ता सांगितला. पोलिसांनी यतीशच्या घरी छापा टाकून चोरीचे तेल जप्त केले. मुख्य अाराेपी हरिश जीवनलाल जैन फरार आहे. 

 
 

बातम्या आणखी आहेत...