आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वा वर्षांपासून युवतीचे शारिरीक शोषण करुन लग्नास दिला नकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय युवकाने एका युवतीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून मागील सव्वा वर्षांपासून वारंवार तिचे शारिरीक शोषण केले. युवतीने त्याला लग्नासाठी गळ घातली तर त्याने लग्नाला नकार देऊन पीडित युवतीला मारहाण केली तसेच मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, मला टाईमपास करायचा, असे म्हणून विश्वासघात केल्याची तक्रार पीडितेने रविवारी (दि. ११) रात्री फ्रेजरपुरा पोलिसात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार व विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

स्वप्नील दादाराव घुटके (२४, रा. फ्रेजरपुरा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. स्वप्निलचे दोन वर्षांपासून एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. यातच अनेकदा त्याने युवतीला लग्नाच्या आणाभाका दिल्यात. त्यामुळे युवतीने स्वप्निलवर विश्वास ठेवला. याच दरम्यान, स्वप्निलने लवकरच आपण लग्न करणार आहोत, असे सांगून मित्र व नातेवाईकांच्या घरी नेऊन वारंवार तिचे शारिरीक शोषण केले. स्वप्निल लग्न करणार, असे वारंवार सांगून अत्याचार करत होता. दरम्यान, ११ नोव्हेंबरला युवतीने स्वप्निलला आपण आता लवकरच लग्न करणार, असे म्हटले. तर त्याने नकार देऊन तिच्यावर ओरडला. त्यावेळी तीला शिवीगाळ करून थापडा व बुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नाही तर तिला सांगितले की, मी तुुझ्यासोबत लग्न करणार नाही, मला केवळ तुझ्यासोबत टाईमपास करायचा होता, असे म्हणून तिला लोटून दिले, त्यामुळे युवतीच्या पायाला दुखापत झाली आहे. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले, त्यानेच विश्वासघात करून टाईमपास केल्याचे सांगितल्यामुळे युवतीने थेट फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात जाऊन स्वप्नीलविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...