आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावडीगोद्री : चालकाला डुलकी लागल्यामुळे पिकअप कलंडून तीन पलट्या खाल्ल्यामुळे एकजण ठार तर बावीस जण जखमी झाले. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर मात्र धोक्याबाहेर अाहे. ही घटना औरंगाबाद-सोलापूर महामार्गाावरील दोदडगाव फाट्याजवळ शुक्रवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, मध्य प्रदेशहून बीड जिल्ह्यातील गेवराई येथे एका जिनिंगमधील कामासाठी मजुरांना या पिक अपमध्ये नेले जात होते. अपघातानंतर वाहनांतील महिला, लहान मुले, पुरुषांनी एकच ओरडा-ओरड केली. यामुळे परिसरातील नागरिकांनी गोंदी पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. परंतु, तब्बल दोन तासानंतर पोलिस घटनास्थळी पोहाचले. तोपर्यंत ग्रामस्थांनी जखमींना रुग्णालयात दाखलही केले होते.
मध्यप्रदेश येथून गेवराई येथील बाहुबली जिनिंग येथे कामासाठी तीस मजुरांना घेऊन जाणारे पिकअप (एमपी १० जी ११८२) वाहन औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील दोदडगाव फाट्याजवळ आले असता चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पिक अपने तीन पलट्या खात रस्त्याच्या बाजूला असलेल्या साइड पंख्याच्या खड्ड्यात जाऊन आदळला. या अपघातानंतर एकच आरडाओरड होत असल्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक व रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनी खाली उतरून मदत केली. काही लहान मुलंही आईच्या कुशीत रडत होती. वाहन कलंडल्यानंतर दोन लहान मुले दहा फूट लांब जाऊन पडले होते. काहींनी या अपघाताची माहिती एनएचआयला दिली असता रुग्णवाहिका आल्यानंतर जखमींना वर काढून रुग्णवाहिकेत टाकून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. याच दरम्यान गंभीर जखमी झालेल्या दिनेश छतरसिंग सोलंकी (२६ शिरवेल ता.शेंडवा जि.बडवानी) मध्य प्रदेश यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
अशी आहेत जखमींची नावे
संगीता सोलंकी (१५, शिरवेल ता.शेंडवा जि.बडवानी),पप्पू रमेश चव्हाण (२० आमसरी ता.भगवानपुरा, जि.खरगोन), गणेश काकडी जमरे (२१ शिरवेल ता. शेंडवा जि.बडवानी), तुकाराम ब्राम्हणे (१२ आमसरी ता.भगवानपुरा, जि.खरगोन) बिला गणेश जमरे (१८), संगीता भुवरे (१८), स्नेहल (पूर्ण नाव माहीत नाही), शीतल यादव (२२), वर्षा सोलंकी (२०), मंजू कांतीलाल दुवे (२०), रेवती हिरालाल सोलंकी (२४), घोडेलाल जलसिंग भुवरे (२४ शिरवेल ता.शेंडवा जि.बडवानी) अशी जखमींची नावे असून यातील काहींचे नावे समजू शकलेली नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.