आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Pink Ball Is As Heavy As A Hockey Ball; Fielding Challenges, Difficult To Catch: Virat Kohali

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुलाबी चेंडू हाॅकीच्या बाॅलसारखा वजनदार; क्षेत्ररक्षणाचे आव्हान, झेल कठीण : काेहली  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - कोलकात्यातील एेतिहासिक ईडन गार्डन मैदान आता पुन्हा एकदा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाेंद हाेईल, अशी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहे. येथील मैदानावर आज शुक्रवारपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या आणि पहिल्या डे-नाइट कसाेटी सामन्याला सुरुवात हाेणार आहे. भारताचा संघ प्रथमच गुलाबी चेंडूवर डे-नाइटचा कसाेटी सामना खेळणार आहे. त्यामुळे या नव्या आव्हानात्मक सामन्यामध्ये घरच्या मैदानावर सरस कामगिरीचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. 

बांगलादेश संघाविरुद्ध दाेन कसाेटी सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा मॅच गुलाबी चेंडूवर खेळवला जाणार आहे. आतापर्यंत गुलाबी चेंडूच्या बाबतीमध्ये अनेक क्रिकेट तज्ञांनी आपापली मते मांडली आहेत. यावर नजर टाकल्यास, गुलाबी चेंडूवरचा हा कसाेटी सामना फलंदाजांसाठी आव्हानात्मक आहे. आणि वेगवान गाेलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचे काहीचे मत आहे. गुलाबी चेंडूचा हा प्रयाेग मैदानावर क्षेत्ररक्षण करताना अधिकच अडचणीचा ठरणारा आहे. तसेच झेल घेताना अधिकच कठीण असल्याचे मत, भारतीय संघाचा कर्णधार विराट काेहलीने मांडले. त्याने कसाेटी सामन्याच्या पूर्वसंध्येला ही प्रतिक्रिया दिली. 

‘डे-नाइट कसाेटी सामना हा कधीतरीच खेळाला जावा, सातत्याने नाही. त्यामुळेच या सामन्याला लाभलेली प्रसिद्धी आणि लाेकप्रियता कायम ठेवता येणार आहे, असेही काेहली म्हणाला.गुलाबी चेंडूंच्या पहिल्या अनुभवासाठी उत्सुक


भारतीय संघ पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या दाैऱ्यावर डे-नाइट कसाेटी सामना खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कसाेटी सामन्यातून भारताच्या संघाला कसून तयारी करता येणार आहे.  सुरुवातीला आम्ही अशा प्रकारच्या कसाेटी सामन्यात खेळण्याला विराेध केला.कारण, आम्ही गुलाबी चेंडूवर काेणत्याही प्रकारचा सराव केला नव्हता. तसेच या चेंडूवर प्रथम श्रेणीचा सामना खेळण्याचाही अनुभव टीममधील खेळाडूंना नाही. आता या सामन्यातून आम्हाला अनुभव येईल, असे काेहली म्हणाला.

विक्रमाची नाेंद


आतापर्यंत ११ डे-नाइट सामने झाले. सर्वच सामन्याचे निकाल लागले. आॅस्ट्रेलियाने गुलाबी चेंडूवर सर्वात यशस्वी संघ हाेण्याचा बहुमान पटकावला.  यावरच्या पाचही सामन्यात आॅस्ट्रेलियाचा विजय नाेंद आहे.  

> आतापर्यंत  सहा देशांत गुलाबी चेंडूवर सामने झाले. आता भारत हा सातवा देश ठरला आहे. 

> या सामन्यात २२ धावांच्या खेळीसह काेहलीच्या नावे सर्वात वेगाने कर्णधाराच्या भूमिकेत पाच हजार धावांची नाेंद हाेईल.ताे पहिला कर्णधार ठरेल.  आता त्याच्या नावे ८५ डावांत  ४९६८ धावा नाेंद आहेत.  

> भारताची २०१२ पासून या मैदानावर विजयी माेहीम कायम आहे.