आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Pink Ball Paints More Than The Red, So The Brighter The Ball, The Faster The Swing Speed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुलाबी चेंडूला लालच्या तुलनेत सर्वाधिक पेंट, त्यामुळे चेंडूला अधिक चमक, स्विंगची गती वेगवान

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत व बांगलादेशदरम्यान पहिली डे-नाइट कसोटी कोलकाता येथे २२ नाेव्हेंबरपासून गुलाबी चेंडूवर खेळवली जाईल
  • पाच देशांत गुलाबी चेंडूने कसोटी सामने झाले, अाता भारत सहावा देश ठरेल
  • भारतात कसोटी एसजी चेंडूवर, गुलाबी एसजी चेंडूचा पहिल्यांदा कसोटीसाठी वापर होईल

​​​​​​​नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यात २२ नोव्हेंबरपासून कोलकाता येथे दिवस-रात्र कसोटी खेळवली जाईल. ही दोन्ही देशातील पहिली दिवस-रात्र कसोटी असेल. कसोटी लाल चेंडूवर खेळवण्यात येते. मात्र, दिवस-रात्र कसोटीत लाल चेंडू स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे गुलाबी चेंडूचा प्रयोग केला जाईल. गुलाबी चेंडूवर लाल चेंडूपेक्षा अधिक रंग वापरण्यात आला आहे. कारण चेंडू लवकर खराब होऊ नये यासाठी. त्यामुळे चेंडूवर अधिक चमक देखील असते. चमक अधिक असल्याने वेगवान गोलंदाजांना स्विंग देखील चांगले मिळेल.
सामन्याला दुपारी १ वाजता सुरुवात होईल. म्हणजे सामन्यात दोन्ही वेळेला फ्लड लाइटचा वापर होईल. कसोटीत एका चेंडूवर ८० षटकांचा खेळ होतो. लाल चेंडू फ्लड लाइटमध्ये स्पष्ट दिसत नाही, दुसरीकडे वनडेत वापरला जाणारा पांढरा चेंडू लवकर खराब होतो. त्यामुळे ९ वर्षे संशोधन केल्यानंतर दिवस-रात्र कसोटीसाठी गुलाबी चेंडू सर्वाधिक उपयुक्त ठरला. आतापर्यंत एकूण ८ देशांत ११ कसोटी दिवस-रात्र खेळवण्यात आल. सर्वाधिक पाच सामने ऑस्ट्रेलियात, दोन सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये झाले. त्यासह इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीज यांच्यात एक-एक लढत झाली.गुलाबी चेंडू व लाल चेंडू यांच्यातील चार फरक असे स्पष्ट

लाल चेंडू... 
- लेदरला केवळ डाय केले जाते, लाल रंग येतो.
- पांढऱ्या धाग्याने शिलाई केली जाते.
- रंगाचा वेगळा वापर होत नाही. त्यामुळे लवकर खराब होतो.
- बनवण्यास चार दिवसांचा वेळ लागतो.गुलाबी चेंडू... 
- लेदरवर डाय केल्यानंतर गुलाबी रंग येत नाही, त्याला रंग दिला जातो.
- काळ्या रंगाच्या धाग्याने शिलाई केली जाते.
- गुलाबी रंगाचा पुन्हा एकदा वापर केला जातो.
- त्याला बनवण्यासाठी आठ दिवसांचा वेळ लागतो.२००६ मध्ये निर्णय... नऊ वर्षांच्या संशाेधनानंतर गुलाबीला पंसती


गुलाबी चेंडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणण्यासाठी ९ वर्षे संशोधन करण्यात आले. २००६ मध्ये गुलाबी कुकाबुरा चेंडूवर एका चॅरिटी सामना घेण्यात आला. त्यानंतर क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था मेरेलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) चेंडू बनवणाऱ्या कंपनीला दिवस-रात्र सामन्यासाठी चेंडू बनवण्यास सांगितले. त्यानंतर कुकाबुराने ९ वर्षे संशोधन केल्यानंतर गुलाबी चेंडूचा निर्णय घेतला. पिवळा व नारंगी चेंडू देखील बनला. हे दोन्ही चेंडू टीव्हीवर पाहण्यास अडचण येत होती. अनेक कॅमेरामन म्हणाले की, या दोन्ही रंगांचे चेंडू पाहण्यास अडचण येत होती. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड पहिली दिवस-रात्र कसोटी लाल कुकाबुरा चेंडूवर खेळवण्यात आली.वनडे, टी-२० मध्ये कुकाबुरा, कसोटीत ३ प्रकारच्या चेंडूंचा वापर
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमध्ये तीन कंपन्यांच्या चेंडूंचा वापर होतो. कसोटीत कुकाबुरा, ड्यूक व एसजी चेंडूचा वापर केला जातो. भारतात एसजी आणि वेस्ट इंडीज-इंग्लंडमध्ये ड्यूकचा चेंडू वापरतात. इतर सर्व देश कुकाबुरा चेंडूने खेळतात. जगात वनडे आणि टी-२० मध्ये केवळ कुकाबुरा चेंडूचा वापर होतो.

कुकाबुरा : मधल्या दोन्ही सीम हाताने शिवलेल्या असतात, शिलाई एकमेकांच्या जवळ जाते. बाहेरील चार सीमची शिलाई मशीनवर केली जाते, हे आपापल्या हद्दीपर्यंत मर्यादित असते. चेंडूची सीम लवकर घासल्या जाते. त्यामुळे फिरकीपटूंना मदतगार ठरत नाही.

ड्यूक : सर्व सहा सीमची शिलाई हाताने केली जाते. सर्व सहा सीमची शिलाई चेंडूच्या सर्व भागाला जोडते. सीम अधिक दिसून येते. रंगाचा अधिकचा थर दिला जातो. त्यामुळे चमक अधिक वेळ राहते. दिसून येणारी सीम फिरकीपटूंसाठी चांगली असते.

एसजी : सर्व सहा सीमची शिलाई हाताने होते. सर्व सहा सीमची शिलाई एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत जोडली जाते. त्यामुळे सीम उभारी घेते. सीम अधिक काळ टिकते. त्यामुळे फिरकीपटूंना मदतगार ठरते. चमक लवकर निघून जाते.
चेंडूच्या सुरक्षेसाठी पिचवर ६ ते ८ मिमी गवताची गरज; त्याचा गाेलंदाजांना फायदा - समंदर सिंग, बीसीसीअाय सेंट्रल झाेनचे क्युरेटर
पहिल्यांदाच एसजी चेंडूवर हाेत असलेल्या कसाेटी सामन्यादरम्यान क्युरेटरचीही परीक्षा असेल. गुलाबी चेंडूचा रंग खराब हाेऊ नये म्हणून पिचवर ६ ते ८ मिमी गवत ठेवण्याची गरज अाहेे. पिचवरील गवताच्या अभावाने चेंडूचा रंग लवकर उडून जाईल. त्यामुळे डे-नाइट सामन्यात खेळताना खेळाडूंना माेठी अडचण निर्माण हाेईल. त्यामुळेच हा माेठा धाेका टाळण्यासाठी गवताचा हा प्रयाेग राबवला जावा.
याशिवाय अाऊटफील्डमध्ये ८ ते १० मिमी गवत ठेवावे. कारण अाॅस्ट्रेलियामध्ये झालेल्या पहिल्या डे-नाइट कसाेटी सामन्यादरम्यान पिचवर ११ मिमीचे गवत ठेवण्यात अाले हाेते. गुलाबी चेंडू हा वेगवान गाेलंदाजांसाठी महत्त्वाचा भाग अाहे. तसेही सध्या वेगवान गाेलंदाज हे घरच्या मैदानावरील सामन्यात सातत्याने सरस ठरत अाहेत. काेलकात्यातील दुसऱ्या कसाेटीदरम्यान दवाचा माेठा धाेका अाहे. अशात सत्राच्या शेवटी चेंडू गाेलंदाजांच्या हातून सटकण्याची गरज अाहे.नव्या चेंडूबाबत दाेन्ही संघांच्या खेळाडूंची गाेडी-गुलाबी.... 

फिरकीपटू ठरतील या ठिकाणी सर्वात यशस्वी : हरभजन सिंग


डे-नाइट कसाेटी सामन्यामध्ये फिरकीपटूंच्या गाेलंदाजीची अॅक्शन लक्षात घेणे अव्वल फलंदाजांना अधिक अवघड असते. त्यामुळेच अाताच्या या सामन्यामध्ये फिरकीचे गाेलंदाज अधिक यशस्वी ठरतील, असा विश्वास भारतीय संघाचा गाेलंदाज हरभजन सिंगने व्यक्त केला. यामध्ये कुलदीप यादव हा रिस्ट स्पिनर अाहे. त्यामुळे त्याचा या मैदानावर दबदबा राहिल. त्याची अॅक्शन समजुन घेण्यासाठी फलंदाजांना माेठी कसरत करावी लागेल, असेही ताे म्हणाला.गाेलंदाज करत अाहेत अाेल्या चेंडूवर कसून सराव : हसन


काेलकाता येथील डे-नाइट कसाेटी सामन्यादरम्यान सर्वात माेठा दवाचा धाेका अाहे. हीच अडचण लक्षात घेऊन अामच्या संघाचे गाेलंदाज अाता अाेल्या चेंडूवर गाेलंदाजीचा कसून सराव करत अाहेत. कारण, मैदानावर प्रत्यक्षात खेळताना याच परिस्थितीचा सामना करावा लागणार अाहे. हे अाम्ही अाधीच लक्षात घेतले अाणि अशा प्रकारे सराव सुरू केला अाहे, अशी माहिती बांगलादेश संघाचा फिरकीपटू मेंहदी हसनने दिली.