आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- हिंदुत्वाने प्रेरित दस्तऐवज संविधानाची जागा घेण्याचा धोका मला दिसतोय, असा इशारा देतानाच सरकारशी संबंधित अनेक संस्थांचे कामकाज कोलमडले आहे. या संस्था काहीही काम करण्याच्या स्थितीत राहिलेल्या नाहीत. काही संस्थांनी बॅकरूम कंट्रोलसमोर गुडघे टेकले आहेत, असा दावा माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केला आहे. काँग्रेस नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत हे मत मांडले आहे.
चिदंबरम यांच्या पुस्तकाचे नाव ' अनडॉटेड : सेव्हिंग द आयडिया ऑफ इंडिया' असून त्याच्या प्रस्तावनेत अन्सारी यांनी सद्यस्थितीवरील भाष्य केले. पुस्तकातील अनेक गोष्टींचा हवाला देत अन्सारी यांनी स्वातंत्र्य, समानता, उदारता, धर्मनिरपेक्षता, खासगी गोपनीयता, वैज्ञानिक दृष्टीकोनासह संविधानाच्या प्रत्येक मूल्यांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे संविधानाच्या जागी हिंदुत्वाने प्रेरित दस्तऐवज येण्याचा धोका स्पष्टपणे दिसून येत आहे. संविधानाच्या महत्त्वाच्या मूल्यांना उद्ध्वस्त करणारी ही वैचारिक दिशाभूल नियोजनबद्धरीत्या सुरू आहे. श्रद्धेच्या जोरावर नागरिकांत भेदभाव निर्माण करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे विविधता हे वैशिष्ट्य संपण्याची भीती आहे. त्याचबरोबर धर्मनिरपेक्षता व बंधुभावावरही मळभ दाटणार आहे, असा दावा त्यांनी केला. काश्मीरच्या मुद्द्यावर अन्सारी म्हणाले, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी या प्रश्नावर माणुसकीच्या दृष्टिकोनातून तोडगा शोधण्याचा प्रत्न केला होता. त्यासाठी पुढाकार घेतला होता. म्हणूनच माणुसकीची मर्यादा सोडण्याचा निर्णय योग्य वाटत नाही.
... तर मग संसदेला कर्तव्याचा विसर
अन्सारी यांनी प्रस्तावनेत देशातील संस्थांचे कामकाज कोलमडल्याचा दावा केला आहे. त्यासाठी अनेक उदाहरणेही दिली. कल्पना करा. चर्चेविनाच अर्थसंकल्प मंजूर होतो. संसदीय समितीच्या परवानगीशिवाय महत्त्वाची विधेयके पारित होत आहेत. असे घडत असल्यास संसद आपले वैधानिक कर्तव्य पूर्ण करत नाही, हे समजून घेतले पाहिजे. त्याचबरोबर सरकारदेखील कर्तव्यात कमी पडत असल्याचे लक्षात घेतले पाहिजे. संस्थांची वाईट स्थिती पाहून सामान्य जनतेचा विश्वात कमी होतो, असे अन्सारी यांनी पुस्तकात लिहिले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.