आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 मार्चला रात्री बुध ग्रह कुंभ राशीमध्ये झाला मार्गी, 7 एप्रिलपर्यंत राहणार याच राशीमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 10 मार्चला रात्री 9 वाजता बुध ग्रहाने कुंभ राशीमध्ये स्वतःची चाल बदलली आहे. हा ग्रह पूर्वी वक्री होता आणि आता मार्गी झाला आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार बुध ग्रह 7 एप्रिलपर्यंत  कुंभ राशीमध्ये राहील आणि त्यानंतर मीन राशीमध्ये प्रवेश करेल. येथे जाणून घ्या, सर्व 12 राशींवर बुध ग्रहाचा प्रभाव कसा राहील...

मेष - बुध ग्रहामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. शिक्षण आणि बुद्धीशी संबंधित कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. घर-कुटुंबात सुख-समृद्धी राहील.

वृषभ - तुमच्या राशीसाठी बुध शुभफळ प्रदान करेल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल.

मिथुन - या राशीच्या लोकांसाठी बुध भाग्याची साथ देणारा राहील. कामाचा व्याप राहील परंतु यशही प्राप्त होईल.

कर्क - बुध ग्रहामुळे चिंता वाढेल आणि अज्ञात भीती राहील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. कामामध्ये हलगर्जीपणा करू नये अन्यथा नुकसान होऊ शकते.

सिंह - या राशीच्या लोकांना बुध ग्रहामुळे प्रेम-प्रसंगात यश प्राप्त होऊ शकते. जोडीदाराकडून सुख मिळेल. विवाह योग्य लोकांच्या लग्न जमण्यात येत असलेल्या अडचणी नष्ट होऊ शकतात.

कन्या - तुमच्या राशीसाठी बुध लाभ करून देणारा ठरेल. आजारी व्यक्तीची तब्येत सुधारेल. शत्रूंवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल.

तूळ - बुध तुमच्यासाठी सुख वाढवणारा राहील. नोकरीत धनलाभ होण्याचे योग जुळून येत आहेत. घर-कुटुंब आणि अपत्यांकडून मदत मिळेल.

वृश्चिक - या राशीच्या लोकांना बुध ग्रहामुळे आईचे सुख मिळेल. कामाचा व्याप राहील. दूरच्या प्रवासाचे योग जुळून येत आहेत.

धनु - बुध ग्रहामुळे भावंडांची मदत मिळेल. पराक्रम श्रेष्ठ राहील. अडकलेली कामे वेळेवर पूर्ण होतील.

मकर - मकर राशीच्या लोकांसाठी बुध यश प्राप्त करून देणारा राहील. स्थावर संपत्तीमध्ये वृद्धी होऊ शकते. वैवाहिक जीवनात सुख-शांती कायम राहील.

कुंभ - या राशीच्या लोकांना बुध ग्रहामुळे भाग्याची साथ मिळेल. उत्पन्नामध्ये वाढ आणि जोडीदाराची मदत मिळेल. अडचणी दूर होतील.

मीन - बुध ग्रहामुळे तुमचे खर्च वाढण्याचे योग जुळून येत आहेत. तणाव राहील. जवळचे लोक धोका देऊ शकतात. हलगर्जीपणामुळे नुकसान होऊ शकते.