आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इनामदार कुटुंबीयांचा शापित 'वाडा' पाहून प्रेक्षक घाबरले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या सातव्या दिवशी नटराज कला विकास मंडळ, जिंतूरच्या वतीने अतुल साळवे लिखित, दिग्दर्शित "वाडा" या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण झाले. एखाद्या भयपटाला लाजवेल अशी दृश्य रचना असलेल्या या नाटकास रसिक प्रेक्षकांनी मात्र भर भरून दाद दिली.


चित्त थरारक असे दृश्य असलेले भय नाट्य, गूढ नाट्य अनुभवता आले ते महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या वाडा या नाटकातून. इनामदार कुटुंबीयांचा एक शापित वाडा त्यात सोपानराव इनामदार यांच्याच मुलीचा मंदाकिनीचा आत्मा वास्तव्यास असते. तिने आत्महत्या केलेली असते. तिच्या अंगावर निर्माण झालेल्या कोडा मुळे तिला इनामदार कुटुंबीय वाळीत टाकतात व त्याला कंटाळून ती आत्महत्या करते. आणि जाता जाता ती इनामदार घराण्याचा विनाश करील असा शाप देते. कालांतराने त्याच घराण्याचा वंशज विक्रम आपल्या पॅडी व सनी या मित्रा समवेत वाड्यात येतो आणि त्यांना वेग वेगळे भयावह अनुभव येऊ लागतात. कालांतराने त्यांना त्या शापित आत्म्याविषयी कळते आणि त्यांना रोज जेवण आणून देणारी चंदा, जिला कोड फुटलेले असते तिच्यासोबत लग्न करून मी त्या घराण्यातील चुकीच्या विचारांशी निगडित नाही. कुरूपता ही त्या त्या व्यक्तीच्या विचारात असते, दृष्टीत असते. एखाद्या घराण्यात असू शकत नाही, हे त्याने कोड फुटलेल्या प्रेयसीसोबत लग्न करून सिध्द करतो आणि शेवटी ती आत्मा त्या वाड्याला शापमुक्त करून निघून जाते.


वाडा या नाटकातील सुनंदा डिघोळकर यांनी साकारलेली मंदाकिनीची भूमिका प्रेक्षकांमध्ये भुरळ पाडून जाते. तसेच कांचन वसेकर यांचीही भूमिकाही लक्षवेधी होती. कमलकिशोर जैस्वाल, योगेश गुंडाळे, सोहम खिल्लारे, हरिभाऊ कदम यांनी आप आपल्या पात्रांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. दत्ता चव्हाण आणि किरण डाके यांनी साकारलेले नेपथ्य वास्तवाचे भास निर्माण करणारे होते. बालाजी दामुके यांची प्रकाशयोजना आणि दिनेश नरवाडे यांचे संगीत नाटकास एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. अनिल साळवे यांची वेशभूषा आशयानुरूप होती.

भयनिर्मितीचे आव्हान लीलया पेलले
एखादे भय नाट्य रंगमंचावर उभे करायचे असेल तर ते दिग्दर्शकासाठी खूप मोठे आव्हान असते आणि ते आव्हान अतुल साळवे यांनी व्यवस्थित सांभाळले. त्या सोबतच अतुल साळवे यांनी साकारलेली विक्रमची भूमिका वाखाणण्याजोगी होती.
 

बातम्या आणखी आहेत...