आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोडाफोडीचे राजकारण म्हणजे राजकीय भ्रष्टाचार ; धनंजय मुंडेंंचा भाजपवर ट्विटरवरून आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी  - राष्ट्रवादीला गळती लागली आहे, असं म्हटलं जात आहे. मात्र हा राजकीय भ्रष्टाचार आहे. हा राजकीय भ्रष्टाचार जर भाजप करत असेल तर तो सत्तेचा गैरवापर आहे, असा आरोप  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी  ट्विट केले आहे. 


भाजपचे शतप्रतिशत यश हेच आहे का?  दुसऱ्या पक्ष्याचे आमदार किंवा  पदाधिकारी फोडणे याचाच अर्थ भाजप  स्वतःला जे शत प्रतिशत समजते हे साफ खोटे आहे, असे मुंडे म्हणाले. २०१४ च्या निवडणुकी आधीही अनेक आमदार पक्ष सोडून गेलेत. ते गेल्याने राष्ट्रवादी   संपणार नाही. कुणी कुठल्या कारणाने आमच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकला हे येणाऱ्या काळात उघडकीस येईल.  सेना-भाजपने  आमिषे दाखवून जे काही केले त्याने आम्हाला काही फरक पडणार नाही.   आजपर्यंत असे राजकारण कुठल्याही राजकीय पक्षाने केले नव्हते. ते राजकारण आज भाजप-शिवसेना करत आहे. मात्र पुरोगामी महाराष्ट्रातील जनता हे खपवून घेणार नाही. भाजपा-सेनेच्या कारकीर्दीत अनेक गंभीर भ्रष्टाचाराची प्रकरणे घडली आहेत. आघाडी सरकार आल्यास या भ्रष्ट नेत्यांवर कारवाईसाठी आम्हाला सत्तेचा गैरवापर करण्याचीही गरज राहणार नाही. त्या भ्रष्ट नेत्यांना स्व:पक्षात राहणे अवघड होऊन जाईल, असे मुंडे यांनी ट्विट करत म्हटले आहे.

 

 

 

बाजी पलटने में देर नहीं लगती 
सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडण्याची एक अनिष्ट राजकीय परंपरा महाराष्ट्रात भाजप-सेनेच्या सरकारने सुरू केली आहे. सरकारे येत असतात, जात असतात... बाजी पलटने में देर नहीं लगती, असेही  मुंडे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...