आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषण घातक हे कळते; पण ८७ टक्के नागरिक म्हणतात, ही जबाबदारी सरकारची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- हवेतील प्रदूषणाबाबत औरंगाबाद शहरवासीयांसह देशभरातील नागरिकांमध्ये जागरूकता वाढते आहे. वाहनांचा वापर कमी करून पायी चालणे, विजेचा कमी वापर, वृक्षारोपण आदी उपाय केल्यास प्रदूषण नियंत्रणात आणता येते, याविषयी नागरिकांना माहिती आहे; परंतु प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी सरकारची असून वैयक्तिक स्तरावर फार काही करण्याची गरज नाही, असे तब्बल ८७ टक्के नागरिकांना वाटते, असे एका देशव्यापी सर्वेक्षणात दिसून आले आहे.

 

> शाळा-महाविद्यालयांतून होणारे प्रबोधन, प्रसार माध्यमांतील बातम्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे औरंगाबादसह देशातील प्रमुख शहरे हवेच्या प्रदूषणाबाबत जागरूक झाली आहेत. हवेच्या प्रदूषणाबाबत सीएमएसआर कन्सल्टंट समूहाने केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्यरत ८० स्वयंसेवी संस्थांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला. महाराष्ट्रातील औरंगाबाद, चंद्रपूर, पुणे, नागपूर आणि मुंबईत हे सर्वेक्षण घेण्यात आले. सर्वेक्षणातील समाधानकारक बाब म्हणजे या शहरांतील नागरिकांना प्रदूषणाशी संबंधित महत्त्वाच्या बाबी उदा. हवेची गुणवत्ता, धूलिकणांचे प्रमाण आदींविषयी माहिती आहे. 

 

हवेतील प्रदूषणाबाबत वाढतेय जागरूकता 

५४ टक्के नागरिकांनी हवेची गुणवत्ता (एअर क्वालिटी इंडेक्स), तर ४७.४ टक्के नागरिकांनी धूलिकण (पीएम २.५ आणि १०) विषयी माहिती असल्याचे सांगितले. १८ ते २५ वयोगटातील नागरिक वेबसाइट, मोबाइल अॅप्लिकेशन्स आणि प्रसारमाध्यमांतून आपल्या शहराच्या हवेची गुणवत्ता जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. हवेच्या प्रदूषणाचे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे तब्बल ७९ टक्के नागरिकांना माहिती आहे. मात्र, हे दूर करण्यासाठी सरकारनेच उपाययोजना करावी, असे ८७ टक्के नागरिकांचे मत आहे. परंतु प्रदूषण दूर करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर फार काही करण्याची गरज नसल्याचे ते म्हणतात. 

 

प्रदूषण घटवण्यासाठी नागरिकांनी सुचवले उपाय 
> ५९.७ % नागरिक- वाहनांऐवजी पायी चालणे योग्य 
> ४०.२ % नागरिक- मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण हवे 
> ३६.२ % नागरिक- विजेचा वापर जपून करणेच श्रेयस्कर 

 

बातम्या आणखी आहेत...