आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माढा लाेकसभा लढवण्याबाबत विचार करणार : शरद पवार; पुण्यातील बैठकीत कार्यकर्त्यांनीही धरला आग्रह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - माढा लाेकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत विचार करू, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याने या मतदासंघातून कोणाला उमेदवारी मिळते याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्सुकता लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राष्ट्रवादीच्या इच्छुकांची शुक्रवारी  पुण्यातल्या बारामती होस्टेलमध्ये बैठक घेण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनीही पवार यांनी माढ्यातून लाेकसभा लढवण्याबाबत आग्रह धरला.  दरम्यान, पवारांच्या गुगलीमुळे विद्यमान खासदार विजयसिंह मोहितेंचा पत्ता कट होणार का ? याबाबत चर्चा सुरू आहे.


या बैठकीत पवारांना माढ्यातून निवडणूक लढण्याची विनंती केली. तसेच पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांनीही असाच आग्रह केला. खरे तर माझी इच्छा नाही. मात्र, आम्ही तुमचे सर्व धोरणात्मक निर्णय ऐकतो. माढ्यामध्ये लढण्याबाबत आमचं ऐका अशी गळ पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घातली आहे, असे सांगत शरद पवारांनी आपण माढ्यामधून लढण्याबाबत विचार करून ठरवू, अशी गुगली टाकली. मात्र, या गुगलीने माढ्याचा गुंता वाढला असून संबंधित लाेकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार विजयसिंह माेहिते पाटील व माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख इच्छुक आहेत. दरम्यान, शिरूर लाेकसभा मतदार संघातून अजितदादांना लढण्याची गरज नसल्याचे त्यांनी  या वेळी सांगितले.  

 
अण्णांबाबतच्या बातम्या आपण वाचत नाही   
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या उपाेषणाबाबत पवार म्हणाले,  या विषयवार मला काहीच भाष्य करायचे नाही, हे मी दोन वर्षांपूर्वीच ठरवले आहे. त्यामुळे त्यांच्यासंबंधीचे वृत्त, चर्चा या मी वाचत नाही आणि बघतही नाही,  असे सांगत हजारेंना टोला लगावला. 


प्रदेशाध्यक्ष  पाटील, आव्हाड यांची वेगळी भूमिका   
माढ्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय  विचार करून ठरवेन, अशी भूमिका शरद पवार यांनी जाहीर केली. मात्र, त्याआधी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार आगामी लाेकसभा निवडणूक लढवणार नाहीत, असे स्पष्टीकरण दिले. तर, जितेंद्र आव्हाड यांनी म्हणाले, पवार निवडणूक लढवतील असे वाटत नाही. त्यानंतर बाहेर आलेल्या  शरद पवार यांनी दोघांचे वक्तव्य खोडले. 

बातम्या आणखी आहेत...