आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता; बहुतांश भागात पारा ४० अंशांच्या वर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - नैऋत्य मोसमी वाऱ्याने रविवारी अनुकूल वाटचाल न केल्याने, तसेच कोरड्या हवेच्या झोतांमुळे राज्यभरात रविवार तीव्र उष्णतेचा ठरला. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमान चाळिशीच्या वर होते. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४५.८ अंश इतकी झाली. हवामान खात्यानुसार दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट टिकून राहील. कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील.


प्रमुख शहरांतील कमाल तापमान : औरंगाबाद 40.4, नाशिक 39.9, सोलापूर 42.5, पुणे 40, सातारा 40.1, परभणी 43.8, नांदेड 42.5, बीड 42.6, अकोला 43.6, अमरावती 43, बुलडाणा 40.5, ब्रह्मपुरी 45.5, गोंदिया 43.2, नागपूर 43.9, वर्धा 44, यवतमाळ 42.5

बातम्या आणखी आहेत...