आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डुलकी लागल्याने फिलिपाइन्सच्या राष्ट्रपतींनी अर्ध्यातच साेडली बैठक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर -  सिंगापूरमध्ये गुरुवारी अासियान-भारत ब्रेकफास्ट व पूर्व अाशिया परिषद झाली. त्यात पंतप्रधान नरेंद्र माेदींसह जगभरातील १८ देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी सहभाग घेतला; परंतु या बैठकीत फिलिपाइन्सचे राष्ट्रपती राॅड्रिगाे दुतेर्ते हे सर्वात जास्त चर्चेत राहिले. कारण ७५ वर्षीय दुतेर्तेंनी झाेप पूर्ण करण्यासाठी बैठक अर्ध्यातूनच साेडून दिली. ते बैठकीदरम्यान डुलकी (पाॅवर नॅप) घेताना अाढळून अाले.

 

त्यानंतर साेशल मीडियावर लाेकांनी दुतेर्तेंना चांगलेच ट्राेल केले. त्यावर ‘झाेप घेण्यात वाईट काय अाहे?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘डुलकी घेऊन तुम्ही अारामाचा अनुभव घेत हाेता का?’ असा प्रश्न लाेकांनी विचारल्यावर ‘झाेप तर पूर्ण झाली नाही; परंतु काही दिवसांचा थकवा घालवण्यासाठी ती डुलकी पुरेशी हाेती’, असे उत्तरही त्यांनी दिले.  


याबाबत फिलिपाइन्सच्या राष्ट्रपती कार्यालयाने पत्रक काढून सांगितले की, दुतेर्ते हे परिषदेच्या चार कार्यक्रमांत सहभागी हाेऊ शकलेले नाहीत. तसेच दुर्तर्तेंचे प्रवक्ते साल्व्हाडाेर पनेलाे यांच्या मते ते रात्री उशिरापर्यंत काम करत असतात. त्यामुळे त्यांना झाेपण्यास कमी वेळ मिळताे. याचा त्यांच्या अाराेग्याशी काहीही संबंध नाही. दरम्यान, गत महिन्यात दुतेर्ते यांनी अापणास कर्कराेग झाल्याचा संशय व्यक्त केला हाेता. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दलही चिंता व्यक्त केली जात अाहे.

 

द. काेरियाच्या राष्ट्रपतींना व्यासपीठावर पेन्स यांनी झाेपेतून उठवले  

हे छायाचित्र सिंगापूरच्या परिषदेचे अाहे. दुतेर्ते यापूर्वीही कमी झाेपेमुळे विविध कार्यक्रम मध्येच साेडून निघून गेलेत. या परिषदेत दुतेर्तेंशिवाय द.काेरियाचे राष्ट्रपती मून जे-इन हेदेखील झाेपताना अाढळून अाले. ते अमेरिकी उपराष्ट्रपती माइक पेन्स यांची प्रतीक्षा करत हाेते. मून यांना त्यांनीच व्यासपीठावर अाल्यानंतर झाेपेतून उठवले.  

 

हिंद-प्रशांत क्षेत्रात अार्थिक हालचालींना वेग यावा : माेदी   

माेदींनी गुरुवारी सिंगापुरात १३ व्या पूर्व अाशिया परिषदेत सहभाग घेतला. या वेळी त्यांच्यासह १८ देशांचे राष्ट्राध्यक्षही उपस्थित हाेते. माेदी हे पाचव्यांदा अशा प्रकारच्या परिषदेत सहभागी झाले. त्यात त्यांनी सदस्य देशांदरम्यान बहुपक्षीय सहकार्य, अार्थिक व सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला. तसेच भारत हा हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता व समृद्धीसाठी कटिबद्ध अाहे, असे सांगून माेदींनी अासियान-भारत ब्रेकफास्ट परिषदेत हिंद-प्रशांत क्षेत्रात समुद्री सहकार्य व व्यापाराच्या केंद्रीकरणावर सर्वात जास्त जाेर दिला.

बातम्या आणखी आहेत...