आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधीच्या सरकारने शेतकरी आत्महत्या लपवल्या, आता त्या खरोखर कमी होताहेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील आघाडी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांची माहिती लपवली जात होती. त्यामुळे तेव्हा तुलनेत कमी आत्महत्या होत होत्या असे चित्र दिसत असले तरी ते खोटे आहे. उलट गेल्या ४ वर्षांत आमच्या उपाययोजनांमुळे प्रत्यक्षात आत्महत्या कमी झाल्या, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. शेतीतली गुंतवणूक वाढवून या आत्महत्या पूर्ण थांबतील, यासाठीच आमचे सरकार प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी सांगितले.


देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारला ३१ आॅक्टोबरला ४ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ते ‘दिव्य मराठी’शी बोलत होते. गेल्या ४ वर्षांत शेतकरी आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढत आहेत. त्या कमी करण्यात सरकारला यश का येत नाही, असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी हा दावा केला. एकाही शेतकऱ्यावर कोणत्याही कारणास्तव आत्महत्येची वेळ येऊ नये यासाठी शेतीवर खर्च दुप्पट करून जलयुक्त शिवारपासून थेट मदत देण्याबरोबरच विमा, स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यापर्यंत सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले. या आत्महत्या विविध कारणांमुळे होत असल्या, तरी आम्ही या शेतकऱ्यांच्या आहेत असे समजून शेतकऱ्यांना मदत करत आहोत, असेही फडणवीस म्हणाले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...