आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज बिलांचा ऐन उन्हाळ्यात झटका; महावितरणकडून एप्रिलपासून करण्यात येणार दरवाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक  - राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच अाता वीज दरवाढीचा जाेरदार तडाखा वीज ग्राहकांना सहन करावा लागणार अाहे. राज्यात वीज नियामक अायाेगाने गतवर्षी सप्टेंबर महिन्यात महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर दरवर्षी हाेणार असलेल्या वीज दरवाढीच्या अनुषंगाने १ एप्रिल २०१९ पासून ६ टक्के वीज दरवाढ होणार अाहे. विशेष म्हणजे, वीज ग्राहक संघटनांनी केलेल्या प्रचंड विराेधानंतरही राज्य वीज नियामक आयोगाने सप्टेंबर २०१८ मध्ये दिलेल्या आदेशानुसार राज्यभरात ही वीज दरवाढ होत असून २०२० पर्यंत २५ ते ३२ टक्क्यांपर्यंत वीज दरवाढीचा भार वीज ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.   

 

वीज ग्राहक संघटनांनी या दरवाढीचे वाभाडे काढले असून महावितरणने एप्रिल २०१८ मध्ये साधारणत: २ टक्के दरवाढ लागू केली हाेती. त्यामुळे सप्टेंबर २०१८ मधील वाढ अल्प म्हणजे ३ ते ४ टक्के ठेवली गेली. पुन्हा एप्रिल २०१९ मध्ये वाढ हाेत आहे. याचमुळे सप्टेंबर २०१८ व एप्रिल २०१९ या दोन्ही वाढींची एकत्रित सरासरी ६ टक्के असून २०२० पर्यंत सर्वच घटकांना घटकनिहाय २५ ते ३२ टक्के दरवाढ हाेणार असल्याचा अाराेप या संघटनांनी केली आहे.   

 

ट्रायब्युनलकडे दाद    
वीज नियामक आयाेगाने महावितरणला वीज दरवाढीच्या प्रस्तावाला जी मंजुरी दिली आहे, ती तटस्थपणा जपत दिलेली नाही, याचमुळे अायाेगाच्या या निर्णयाविराेधात मी दिल्ली येथील अपीलेट ट्रायब्युनलमध्ये आव्हान दिले आहे. त्यावर तीन महिन्यांत सुनावणी अपेक्षित असल्याचे ग्राहक प्रतिनिधी अॅड.सिद्धार्थ साेनी यांनी सांगितले आहे.


वीज बिलांचा ऐन उन्हाळ्यात झटका
उन्हाळा वाढत असल्याने पुढील दाेन-तीन महिने पंखे, एअरकंडिशनर, कूलर, रेफ्रिजरेटर यांचा वापर वाढणार आहे. यामुळे राज्यातील घराघरातील विजेचा वापरही वाढणार आहे. 

 

असे असतील नवे महावितरणचे वीज दर    
> दरमहा १०० युनिट वापर असलेल्या ग्राहकांसाठी वीजदर ५.३० रुपये प्रति युनिट असून यात आता १६ पैशांनी वाढ होणार असून ग्राहकांना प्रति युनिटसाठी ५.४६ रुपये मोजावे लागतील.   

> १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांसाठी वीजदर १५ पैशांनी वाढणार आहेत.   

 

निवडणुकांमुळे ६ टक्के दरवाढीचा देखावा
लोकसभा एप्रिल-मे २०१९ मध्ये व विधानसभा ऑक्टोबर २०१९ पर्यंत म्हणून आज ६ टक्क्यांचा देखावा, प्रत्यक्ष अटळ वसुली १५ टक्के अधिक व्याज अशी आहे. त्यामुळे वीज नियामक अायाेगाच्या दरवाढीच्या निकालामध्ये अप्रत्यक्षरीत्या राज्य सरकारही सहभागी आहे, असे दिसून येत आहे.
प्रताप हाेगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना

बातम्या आणखी आहेत...